spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

Manmohan Singh Decision : भाजप फुटली असती जर मनमोहन सिहं यांनी ‘तो’ निर्णय घेतला नसता

Manmohan Singh Decision : भाजपचे उपनेते भाजपमध्ये अस्वस्थ होते त्यामुळे काँग्रेस नेत्यांशी बोलून त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश निश्चित झाला होता.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी स्वबळावर स्वतःची कारकीर्द घडवली. स्वप्रतिभेच्या जोरावर पंतप्रधान पद मिळवले. ते हाडाचे राजकारणी नव्हते पंरतु राजकारणी मूल्ये आयुष्यात महत्वाची आहेत या धोरणाचे ते व्यक्ती होते. त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय भारतासाठी कायमचा महत्वपूर्ण ठरले. प्रत्येक निर्णयामुळे त्यांच्यातील मूल्याधिष्ठित राजकारणी कायमच दिसून आला.

भाजप लोकसभा उपनेते गोपीनाथ मुंडे भाजप पक्षांमध्ये अस्वस्थ होते. काँग्रेस नेत्यांशी बोलून त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देखील मिळत असताना त्याच्यासोबत महाराष्ट्रातील भाजपचे काही आमदार देखील काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. त्यावेळी पंतप्रधानपदी मनमोहन सिंह होते. त्यांना या पक्षप्रवेशाची बातमी काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आली. मनमोहन सिंह यांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. मी पंतप्रधान असताना लोकसभेमधील एकही भाजपच्या उपनेत्याला पक्षप्रवेश दिलेला मला चालणार नाही, अशा पद्धतीने पक्ष फोडायचा नसतो, असा ठाम निर्णय देत त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा पक्षप्रवेश थांबवला.

मनमोहन सिंह हे त्यांच्या कारकीर्दीत कायमच यशस्वी व्यक्तिमत्व ठरले आहेत. परंतु दुसऱ्यांदा २००९ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि काळाच्या सुरुवातीलाच विविध अडचणी येऊ लागल्या. अन्ना हजारे यांचे आंदोलन, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा यांमुळे सरकारवर टीका होऊ लागल्या. २०१४ च्या लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या सर्व टीकांना त्यांनी संयमपणे हाताळले. इतिहास नक्कीच मला न्याय मिळवून देईल, असे त्यांनी टीकाकारांना म्हटले होते.

मनमोहन सिंह हे पंतप्रधानपदी असताना जगावर आर्थिक मंदीचे सावट आले होते, मात्र भारतीय अर्थव्यवस्था स्थिर ठेवली. या घटनेची दखल घेत अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी मनमोहन सिंह यांचे जाहीर कौतुक केले, आपण मनमोहन सिंह यांचा सल्ला घेत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मनमोहन सिंह यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, अर्थमंत्री, पंतप्रधान अशी पदे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत भूषवली आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss