Manoj Jarange Patil: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला काल पूर्णविरामी मिळाला. वाल्मिक कराडच या हत्या प्रकरणाचा सूत्रधार आहे हे समजल्यावर समाजमाध्यमांवर धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. तर काल रात्री सरपंच संतोष देशमुख यांची छळ करुन हत्या केल्याचे फोटो आणि काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधातही संताप व्यक्त केला जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले. तर, धनंजय मुंडे यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारत पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे दिल्याचे सांगितले आहे. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत असून संताप व्यक्त केला जात आहे. मनोज जरांगे यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय काय नाही दिलाय त्याच काही नाही मात्र यातून त्यांची मग्रुरी तशीच दिसत आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तब्येतीचे कारण पुढे केले आहे. मुखमंत्री आणि अजित पवार यांना यांची मग्रुरी ही आता समोर आलीय. यांची लंका पाण्यात दुबल्या शिवाय राहणार नाही. यांच्यातील मग्रुरी आत्ता महाराष्ट्र सामोरं आलीय. तू हणल्या सारख कर मी मारल्या सारख करतोय अस या सरकारच सुरू आहे, धनंजय मुंडे ३०२ चा आरोपी आहे. अजित पवार आणि मुखमंत्र्यानी नैतिकता म्हणून यांनी काल बोलल्या नंतर राजीनामा घेतला. या टोळीचा नायनाट लोक करतील. यांच्याकडे पैसे जास्त झाले की हे जास्त माजतात. असा घणाघात मनोज जरांगेनीं केला.
पुढे बोलताना, धनंजय मुंडे ३०२ मध्ये आहेत, या प्रकरणाचा तपास पुन्हा पुन्हा करावा यात सर्वसह आरोपी झाले पाहिजे. तर पुढे यांना चौकात गोळ्या घातल्या पाहिजे.सरमांडे याला माझं म्हणणं आहे तुमच्या डोक्यावर हे पाप घेऊ नका धनंजय मुंडे यांचे नाव त्यांनी घ्यावं. ८० दिवसानंतर हे प्रकरण कुठं तरी देशमुख परिवारकडे दडपण्याचा पर्यंत होता मात्र जनतेने हा लढा हातात घेतला म्हणून आज राजीनामा झाला. धनंजय मुंडे यांनी पापात सहभागी व्हावं, स्वतःहून मी हे पाप केलं अस म्हणायला पाहिजे. कृष्णा आंधळे याला धनंजय मुंडे यांनी गायब केलं, त्या चाटेचा मोबाईल ही धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. त्यांनी आमदारकीचा पण राजीनामा द्यावा. भगवान गडाच्या महाराजांची मानसिकता यावर पी एच डी झालीय. असे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर जरांगे पाटीलांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हे ही वाचा:
Santosh Deshmukh Murder: मन विचलित करणारे संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटोस आले समोर
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश