spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिला सरकारला इशारा

संपूर्ण राज्यभर मराठा आंदोलनाचे पडसाद मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. राज्यातील काही ठिकाणी जाळपोळ, लाठीमार करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यभर मराठा आंदोलनाचे पडसाद मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. राज्यातील काही ठिकाणी जाळपोळ, लाठीमार करण्यात आला आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी मराठा आंदोलनावर पत्रकार परिषद घेतली. या आधी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर तिघांनीही सविस्तर भूमिका मांडल्या आहेत. जालना जिल्ह्यात उपोषणा करता बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यतील मराठा लोकांना ओबीसी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अशी अशीं मागणी केली आहे. पण आज या बाबत मुख्यमंत्री घोषणा करतील असं सगळ्यांना वाटत होत पण त्यांनी या बाबत कोणती ठोस भूमिका घेतली नाही. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे.

“मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या. तुम्ही चर्चेचं दार खुलं केलं असं म्हणून पहिलेच पाढे बोलू नये. त्यामुळे सरकारने आमचं आरक्षण जाहीर केलं असेल, सरकारने शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल, सरकारने शंभर टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला असेल. कारण त्याठिकाणी छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले देखील होते. सरकारचं शिष्ठमंडळ येताना मराठा आरक्षणाच्या विजयाचं पत्र घेऊन येईल”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. “सरकारचं शिष्ठमंडळ जीआर घेऊन येतंय. आम्ही त्याची वाट पाहतोय. पण जीआर आला नाही तर आंदोलन मागे घेणार नाही. जीआर आलं नाही तर उद्यापासून पाणी सुटलं ते समजा. सरकारच्या प्रतिनिधीची वाट बघेन. त्यानंतर मी अधिकृत भूमिका जाहीर करेन. आम्ही आता अधिकृत असं काहीच बोलू इच्छित नाही. पण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा जीआर घेऊनच सरकारचं शिष्टमंडळ येईल” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.

सरकारकडे दोन दिवसाचा वेळ आहे. मराठा घाबरला नाही आहे. प्रत्येकाच्या कानांकनात ऊर्जा आहे , आणि मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेव्हाच थांबणार त्यांचं शिष्ठमंडळ येतंय अशी माहिती मिळाली आहे. या शिष्टमंडळाने माहिती दिल्यानंतर आमची गावकऱ्यांसोबत बैठक पार पडेल. या बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल”.

Latest Posts

Don't Miss