spot_img
spot_img

Latest Posts

मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर , मराठवाड्यातील बस सेवा बंद

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील नागरिक आंदोनासाठी बसले होते.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील नागरिक आंदोनासाठी बसले होते. तेव्हा पोलिसांनी या आंदोलकानावर लाठीमार केल्याने मराठा आंदोलकांनी दगड फेक केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. काही ठिकाणी बस जाळण्यात आल्या तर काही गावामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तर काही ठिकाणी बस फोडण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी म्हणून मराठवाड्यात ( Marathwada) जाणाऱ्या शेकडो बसेस रद्द करण्यात आल्या आहे. औरंगाबाद, बीड, जालना, लातूरसह अहमदनगरकडे जाणाऱ्या अनेक बस सध्या डेपोतच उभ्या असल्याचे दिसून येत आहेत. तर ६०० पेक्षा बस रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले आहेत.

जालना (Jalna) जिल्ह्यात मराठा समाज आरक्षणासाठी बसले तेव्हा पोलिसांनी लठमारी केला. त्यामध्ये अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले आहेत. या आंदोलनामुळे सगळीकडे जाळपोळ करण्यात येत आहे. मराठवाड्यात जाणाऱ्या १६ बस स्थगित करण्यात आल्या आहेत. या सगळ्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. मराठवाड्यतून यवतमाळला जाणाऱ्या बस थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. ठिकठिकाणी चालू असलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.जालना येथे झालेल्या लाठीमाराचे पडसाद सगळीकडे उमटले आहे. गेल्या दोन दिवसात अनेक ठिकाणी बसची तोडफोड करण्यात आहे. आज सकाळपासून एकही बस पुण्यातून यवतमाळ, औरंगाबाद , धुळे मध्ये जाण्यासाठी सुटली नाही. आज रविवार असल्यामुळे अनेक नागरिक गावाकडे जाण्यासाठी निघतात पण आज सकाळपासून बस नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या बस केव्हा चालू होतील या बाबतची कोणतीही माहिती मिळाली नाही आहे.

औरंगाबाद आणि जालना मध्ये मोठ्या प्रमाणावर या घटनेचे पडसाद उमटले आहे. औरंगाबाद मुख्य बस स्थानक आणि सिडको बस येथून जालनाकडे जाणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद आणि मराठवाड्यासह इतरही जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

Latest Posts

Don't Miss