मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आले असून जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात दहा गुणांमध्ये २०० पेक्षा अधिक अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. आमदारांचे घर राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करून आगही लावण्यात आली. हीच परिस्थिती आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
अनेक गावांमध्ये रोज आंदोलन होत आहे. गंगापूर वैजापूर पाचोड वडोद या बाजारांमध्ये ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच निष्पन्न आंदोलन करताना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांची खबरदारी आणि योग्य नियोजनामुळे जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही शहर आणि ग्रामीण पोलीस सातत्याने आंदोलन कर्त्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे प्रत्येक घडामोडींवर लक्ष राहिले आहे. मराठा आरक्षणावरून मराठवाड्यातील अनेक भागात हिंसक आंदोलनामुळे वातावरण चिघळत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहर आणि ग्रामीण पोलीस अलर्ट झाले आहेत. पोलिसांकडून मराठा आरक्षणाबाबत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहेत. तसेच, आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावे कायदा व सुव्यवस्था राखावी तोडफोड करू नये तसेच जाळपोळीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली यासोबतच अनेक ठिकाणी रास्ता रोको करून टायर जाळण्यात आले. त्यामुळे आता पोलिसांनी थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मागील दोन दिवसात जिल्ह्यात करण्यात आलेल्या अनेक आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात दहा गुन्ह्यांमध्ये २०० पेक्षा अधिक अज्ञात व्यक्तींवर सुद्धा कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा :
SHRIKANT SHINDE: व्हीआयपी कल्चर नकोय, रस्ता बंद करण्याचा आम्हाला अधिकार नाही
आजचे राशिभविष्य, २ नोव्हेंबर, २०२३, इतरांना दुखावू नका