Friday, December 1, 2023

Latest Posts

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, मराठवाड्यात १२ बस फोडल्या…

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केले आहे. तर राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. गावागावात आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा देखील पाहायला मिळत आहे.

मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात तब्बल १२ बस फोडण्यात आल्या आहेत. तर जालन्यात महिला तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली आहे. तर, दुसरीकडे बीडच्या आष्टीत तहसीलदाराची गाडी अज्ञात लोकांनी पेटवून दिली आहे. जालना जिल्हा देखील एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. परभणी आगाराच्या तीन बसेसवर परभणीकडे जात असताना जालन्यातील रामनगर ते मंठ्यादरम्यान दगडफेक झाली आहे. सोबतच, जालन्यातून घनसावंगी जाणाऱ्या बसवर घनसावंगीत दगडफेक करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर जवळपास २५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जालना जिल्ह्यातील रामनगर येथे तहसीलदाराच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडलीय, जालना तालुक्यातील बाजीउम्रद गावात मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांनी चर्चेसाठी येण्याची मागणी होती. दरम्यान, आंदोलनास्थळा जवळून जाणाऱ्या तहसीलदारांची गाडी आडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. तर दुसऱ्या घटनेत बीडच्या आष्टीत तहसीलदार यांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची घराच्या आवारात उभी असलेली शासकीय गाडी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहे. या आगीमध्ये तहसीलदारांच्या गाडीचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. आग कशाने लागली? किंवा कोणी लावली याचे कारण अस्पष्ट असून, पोलिसांकडून तपास केला जात आहे. अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यात देखील मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात ६ बसची दगडफेक करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. धाराशिव ते लातूर या बसवर रविवारी दुपारी दगडफेक करण्यात आली. तसेच, धाराशिव ते औसा या बसवर सांजा गावाजवळल,भूम आगारातील वालवड या बसवर वालवड गावातच, धाराशिव तालुक्यातील कोल्हेवाडी येथे निलंगा – पुणे, तर येडशी येथे धाराशिव -कळंब या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील १४४ एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss