पुण्यातील (PUNE) खराडी येथे मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE-PATIL) यांची आज जाहीर सभा पार पडत आहे. पुण्यातील खराडी येथील महालक्ष्मी लॉन्सवर (MAHALAXMI LAWNS) सभा पार पडणार असताना सभेच्या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आज २० नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे-पाटील यांची पुण्यात (PUNE) आणि संध्याकाळी कल्याण (KALYAN) या ठिकाणी सभा पार पडणार आहेत.
मराठा समाजाने प्रत्येकाला आधार दिला, मराठा समाज सगळ्यांच्या कल्याणासाठी लढत राहिला. मराठा समाजाने कधीच जातीवाद केला नाही. समाजातील गोर-गरिबांचे आम्ही नुकसान करणार नाहीत, असे यावेळी मनोज जरांगे-पाटील सभेत म्हणाले. मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही. सगळ्यांच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवण्याचा काम मराठ्यांनी केले. माझ्या बांधवांनी कधीच कुणाची जात शोधली नाही. प्रत्येकाला आम्ही आधार दिला. माझ्या बापजाद्यांनी अनेकांना दिले. स्वत: चं लेकरू उघड पडलं, पण दुसऱ्याच्या लेकरांना सगळं दिलं. जात त्यांनी कधीही मानली नाही. माझ्या बापाने लोकांच्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम केलं. लोकांना माझ्या बापाने पोटभरं दिलं. पण आता आपल्या लेकरांसाठी लढण्याची गरज आहे, असे पुण्यातील सभेत मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा:
CRIME: सायबर चोराकडून डॉक्टरांची फसवणूक
प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट