वाल्मिक कराडला आता आता झाली, आता पुढचे सापडतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोण कोण मोठे मासे आहेत ते आता सापडतील, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे की नाही हे आता लवकरच सिद्ध होईल. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फरार होण्यासाठी कोणी मदत केली? त्यांना कोणी सांभाळले , हे आता लवकरच चौकशीमधून समोर येईल.
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी चर्चा करण्यासाठी गेलो होतो. संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अजून अटक का झाली नाही, याबाबत चर्चा झाली. आमच्या सर्वांची इच्छा आहे सगळे आरोपी अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरु झाले आहेत.
“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बरेचसे आरोपी अद्याप फरार आहेत. सर्व आरोपींना अटक होऊन संपूर्ण कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. वाल्मिक कराडला अटक झालीय आता पुढच्या काळात मोठमोठे मासे सापडतील. आरोपींना अटक न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार. पोलीस यामध्ये कोणालाच सोडणार नाहीत. चौकशी सुरु आहे संबंध आहे की नाही हे सिद्ध होईलच. यामध्ये जे जे येतील त्यांना सु्ट्टी दिली तर महाराष्ट्र बंद पाडणार,” असे मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाविषयी येणाऱ्या २५ तारखेपर्यंत काय निर्णय घेतात याकडे आमचे लक्ष लागले आहे. २५ जानेवारीपासून आम्ही परत आमरण उपोषण करणार आहोत. तेव्हा ही सरकारने मध्ये हेच होते आता फक्त खांदे बदलले आहेत. एका लेकराचा जीव गेला आहे, न्याय मिळाला नाही तर समाधानी असण्याचे कारण नाही.
हे ही वाचा:
शिवसेना ठाकरे गटाला राजन साळवी निरोप देण्याच्या तयारीत
Santosh Deshmukh Murder Case : मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची मोठी अपडेट; CID घेणार दखल