spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Marathi Language Conservation Fortnight: ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त चौगुले पब्लिक स्कूलमध्ये काव्यवाचन उपक्रम; विद्यार्थ्यांचा काव्यवाचन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद

मराठी आणि अमराठी भाषिक सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने निवासी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत येथील चौगुले पब्लिक स्कूलमध्ये कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाचवी ते आठवीपर्यंतच्या एकूण २१ विद्यार्थी सहभागी झाले. शाळेच्या प्राचार्य पुजा साल्पेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका दिपाली सावंत आणि दिपाली कदम यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सराव करून घेतला. चौगुले पब्लिक स्कूलच्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी वर्तमान विषयक तसेच बालकविता सादर केल्या. कोमडे दादा, सॅण्डविच, आई कशी होती रे, भारत माता,  माणूस, आयुष्य, स्त्रीशक्ती, कुतूहल, चिमणीचे लग्न अशा विविध विषयांवरील कवितांचे वाचन केले.

मराठी आणि अमराठी भाषिक सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय पारितोषिक दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. इयत्ता सातवीची अदिती माने या विद्यार्थींनीने स्त्रीशक्तीवर आधारित कविता सादर करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तनुजा सांळुके हिने आयुष्य या विषयावरील कविता स्पष्ट उच्चारात सादर केली. तिने दुसऱ्या क्रमांक पटकावला. इयत्ता सातवीतील कमलेश याने आईवर सुंदर कविता सादर केली. तर तनुष्का या आठवीतील विद्यार्थ्यांनीने वर्तमान परिस्थितीवर आधारित कविता सादर केली. या दोन्ही विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.

या कविता स्पर्धेस परीक्षक आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा आणि माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होत्या.

हे ही वाचा : 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss