मराठवाड्यातील विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) यांचे नाव दिल्यानंतर नामविस्तार दिन साजरा करायला सुरुवात करण्यात आली. त्यानिमित्ताने आज १४ जानेवारीला विद्यापीठ गेटवर राज्यभरातून अनेक अनुयायी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे १७ वर्षे आंदोलन झाले. नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुभाव पुढे नेणारा लढा होता. तो नामविस्तार दिन १४ जानेवारी म्हणून मोठ्या उत्साहाने संभाजीनगर येथे साजरा केला जातो. यंदा या दिवशी मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादनासाठी येण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५८ या वर्षी मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठ याचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला गेला. सामाजिक लढ्यात १९७२ ला दलित पॅंथरची स्थापना झाली. संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, या मागणीनं जोर धरला. १९७४च्या मराठवाडा विकास आंदोलनात नामांतराची मागणी झाली. दलित युवक आघाडी ही नामांतराच्या मागणीचा पाठपुरावा करत असे. १९७७ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली. नामांतराचं आश्वासनही दिलं. १९७८ला महाराष्ट्रात सरकार बदललं त्यानंतर २७ जुलै १९७८ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली. दलित पँथर नेते प्रा. अरुण कांबळे यांनी या नामविस्तारास विरोध दर्शविला. पँथरला निर्भेळ नामांतर हवे होते. शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली. एकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तर दुसऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अशी विस्तारित नावं दिली गेली. तो नामविस्तार दिन १४ जानेवारी म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद येथे साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे १७ वर्षे आंदोलन झाले.
हे ही वाचा:
बर्थडेचं खास गिफ्ट म्हणून चाहतीने गोंदवला खास टॅटू!