जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट हे बंद राहणार आहे. पण यामध्ये एपीएमसीच्या तीन बाजारपेठा बंद राहतील. यामधील भाजीपाला आणि फळ मार्केट मात्र सुरु राहणार आहे. कांदा-बटाटा आणि मसाल्याच्या बाजारपेठा या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यता आला आहे. माथाडी नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे आता माथाडी कामगारांनी देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात संतापाची लाट उसळलीये. अनेक तरुण या आरक्षणासाठी आत्महत्या करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माथाडी कामगारांकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच आता राज्य सरकार या कामगारांच्या निर्णयावर कोणती भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं आहे. तसेच महत्त्वाच्या बाजारपेठा बंद राहणार असल्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचं देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण पुकारलं आणि पुन्हा एकदा राज्यात आरक्षणाची मागणी तीव्र होत गेली. अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा :
धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या
‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत