spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

मराठा आरक्षणासाठी जालन्यात उद्या जनआक्रोश आंदोलन…

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उद्या (२९ ऑगस्ट) रोजी जालन्यात (Jalna) भव्य आंदोलन केले जाणार आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उद्या (२९ ऑगस्ट) रोजी जालन्यात (Jalna) भव्य आंदोलन केले जाणार आहे. शहागड येथील पैठण फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे. आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी हे जनआक्रोश आंदोलन होत असून, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. ज्यात औरंगाबाद (Aurangabad) आणि जालना या दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांकडून वाहतूक बदल करण्याबाबत पत्र काढण्यात आले आहे.

जालना येथील पैठण फाट्यावर होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तर, वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जालना आणि औरंगाबाद पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ज्यात २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचे आदेश जालना पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे (Dr. Rahul Khade) यांनी जारी केले आहे. तर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून देखील असेच आदेश काढण्यात आले आहेत.

जालना पोलिसांचे आदेश…

  • जालना-अंबड-वडीगोद्री शहागड मार्गे बीडकडे जाणारी वाहने ही पर्यायी मार्ग अंबड घनसावंगी-आष्टी-माजलगाव मार्गे बीडकडे जाईल.
  • शहागड मार्गे साष्ट पिंपळगाव-पैठणकडे जाणारी वाहने ही पर्यायी मार्ग शहागड-महाकाळा-साष्ट पिंपळगांव मार्गे पैठणकडे जाईल.
  • पैठणकडून शहागडकडे येणारी वाहणे ही पर्यायी मार्ग साष्ट पिंपळगाव-महाकाळा-शहागडकडे जातील.

औरंगाबाद पोलिसांचे आदेश…

  • औरंगाबाद-पाचोड शहागड मार्गे बीडकडे जाणारी सर्व वाहने हे पाचोड पैठण-उमापुर-बीड या पर्यायी मार्गाने जातील.
  • बीड-शहागड-पाचोडमार्गे औरंगाबादकडे जाणारी सर्व वाहने हे बीड-उमापूर-पैठण-पाचोड या पर्यायी मार्गाने जातील.

हे ही वाचा: 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी आनंदाची बातमी घोषित, गणेशोत्सव मंडळांसोबत…

अजित पवार NCP गटाला पक्षासह चिन्हही मिळणार, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss