Monday, December 4, 2023

Latest Posts

Mahad मध्ये केमिकल कंपनीत भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

रायगड जिल्ह्यातील महाडमधून एक मोठी अपडेट नुकतीच समोर आली आहे. महाड एमआयडीसीतील (Raigad Mahad MIDC fire) केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाडमधून एक मोठी अपडेट नुकतीच समोर आली आहे. महाड एमआयडीसीतील (Raigad Mahad MIDC fire) केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. ब्लू जेट केमिकल कंपनीत (Blue Jet Healthcare company fire) लागलेल्या आगीत ११ कामगार अडकल्याची माहिती आहे. तर ५ कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी एक आहे. या कंपनीत सकाळी ११ च्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटाचं असल्याचं क्षणार्धात लक्षात आलं. या स्फोटामुळे सगळीकडे धावपळ सुरु झाली. आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र स्फोट आणि गॅस गळती सुरु झाल्यानंतर, सर्वत्र आग पसरू लागली. यामध्ये कंपनीतील काही कर्मचारी अडकल्याची भीती आहे. या स्फोटानंतर आगीने क्षणार्धात पेट घेत, सगळीकडे आग पसरली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय पोलीसही दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या गॅसगळतीमुळे एका कामगाराची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यापैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. गॅस गळतीमुळे (Gas leakage) आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. सकाळी ११ च्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि महाडचे प्रांताधिकारी दाखल झाले आहेत. महाड आग दुर्घटनेमध्ये ११ जण अजूनही अडकून पडल्याची माहिती आहे. तर पाच जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यापैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे. या कंपनीत ५७ कामगार काम करत होते. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल आहेत, अशी माहिती महाडच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिली. या अग्नितांडवात कुणीही दगावल्याची पुष्टी महाडच्या प्रांताधिकाऱ्यांनी केलेली नाही.

हे ही वाचा : 

फुलंब्रीकर कुटुंब  कसं आहे,हे जाणून घ्यायचंय तर  या कुटुंबाला एकदा येऊन तर भेटा!

शाहरुखच्या ‘डंकी’ मध्ये झळकल्या ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss