Friday, December 1, 2023

Latest Posts

नोव्हेंबर महिन्यात गारठा कमी राहणार, हवामान खात्याचा अंदाज

नोव्हेंबर महिन्यात गारठा कमी राहणार, हवामान खात्याचा अंदाज

राज्यातील तापमानात घट झाल्याचं चित्र दिसून येत असून ऑक्टोबर हिटच्या उकाड्यापासून सुटका झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे उन्हाचे चटके आणि झळा देखील कमी झाल्याचं दिसून येत आहे, राज्यात तसेच देशात गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झालेली आहे. पण नोव्हेंबर महिन्यात थंडी लागण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. कारण, नोव्हेंबर महिन्यात कमी थंडीचा अंदाज हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात पावसाची रिमझिम सुरूच राहणार आहे. दक्षिणेतील तामिळनाडू आणि केरळात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. केरळच्या समुद्रकिनाऱ्यातील आरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही भागात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर काही विभागात तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

नोव्हेंबर महिन्यातही पडणार रिमझिम पाऊस

भारतीय हवामान खात्याने मंगळवारी नोव्हेंबर महिन्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला गेला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या नोव्हेंबर महिन्यात कमाल आणि किमान या दोन्ही तापमानात घट होणार आहे, यामुळे थंडी कमी राहणार आहे. त्यासोबतच हवामान विभागाने या महिन्यात पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातीलआणि राज्यातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण देखील कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नोव्हेंबर महिनाच्या शेवटी मुंबई, ठाणेसह कोकणात थंडीचा जोर वाढणार आहे.

अलनिनोच्या झालेल्या प्रभावामुळे देशातील बहुतेक भागात नोव्हेंबर महिन्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात दक्षिणेच्या राज्यातील काही भागात, उत्तर-पश्चिमचा बहुतांश भाग आणि पूर्व-मध्य, पूर्व आणि ईशान्येकडील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असून या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

हे ही वाचा : 

CM EKNATH SHINDE ON MARATHA RESERVATION:मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे

दिवाळीत मिठाई घेण्यापूर्वी “हे” लक्षात घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss