spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

MHADA Lottery 2025 : तुमच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार; 2 हजार घरांची लॉटरी

MHADA Lottery 2025 : लवकरच म्हाडा तुमचे स्वप्न पूर्ण करणार असून २ हजार घरांची लॉटरी निघणार आहे. म्हाडाने नुकत्याच कोकण मंडळाच्या २१४७ सदनिका व ११० भूखंड विक्रीकरिता सुमारे २४,९११ अर्ज रकमेसह प्राप्त झाले होते. म्हाडाची सोडत निघाली होती. त्यात अनेकजणांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे आता निराश होण्याची गरज नाही. कोकण मंडळाने पुन्हा एकदा नवीन घरांची योजना आणली आहे. म्हाडाच्या या उपक्रमामुळे सर्वसामान्यांना अल्पदरात घरे उपलब्ध होत असतात. मात्र, आता मुंबईत घरांसाठी जागाच शिल्लक नसल्याने त्याचा परिणाम म्हाडाच्या लॉटरीवर होऊ लागला आहे. सर्वसाममान्य नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध व्हावीत यासाठी आता म्हाडा आणि एसआरए संयुक्तपणे प्रकल्प राबवणार आहे.

म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या कोकण मंडळाच्या सोडतीत ज्यांना घर लागले नाही त्यांना आता निराश होण्याची गरज नाही. कारण आता काही महिन्यातचं म्हाडाचे कोकण मंडळ सुमारे २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार असून यात चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच ११७३ घरांचा समावेश असणार आहे. त्याबरोबर ना हरकत प्रमाणपत्रानंतर घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन सोडत काढल्या असून सुमारे दहा हजार जणांचे घराचे स्वप्न साकार केले आहे. आता या वर्षी पुन्हा एकदा सुमारे दोन हजार घरांची सोडत काढण्याची कोकण मंडळाची तयारी आहे. यात म्हाडाने स्वतः चितळसर येथे उभारलेल्या ११७३ घरांसह १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत हाऊसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचा देखील समावेश असणार आहे.

चितळसर येथे म्हाडाने २२ मजल्याच्या ७ इमारती तयार केल्या असल्या तरी या परिसराला पाणी आणि रस्त्याची समस्या आहे. ठाणे महानगर पालिकेने अद्याप या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र दिले नसून यामुळे सोडतीचे काम रखडले आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळताच म्हाडा लॉटरीला सुरुवात होईल आणि सर्वसामान्य लोकांना याचा लाभ मिळू शकेल.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss