spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांची घोषणा; शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

पुण्यात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस आयुक्तालयात आज बैठक घेतली आहे. योगेश कदम यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक घेत शहरातली कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना त्यांनी पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार असल्याची माहिती दिली आहे. पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यांनंतर योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

नेमकं योगेश कदम काय म्हणाले?

पदभार स्वीकारला तेव्हापासून पुण्यात आज माझा पहिला दौरा आहे. पुणे आयुक्तालयाच्या मी आज आढावा घेतला. 100 दिवसाच्या प्लॅनची अंमलबजावणी कशी केली जात आहे, याचा आढावा घेतला. पुणे पोलीस प्रशासनाला शासनाकडून काही अपेक्षा आहेत. दरवेळेला आम्ही सूचना करत असतो. परंतु, पोलीस कमिशनर असतील त्यांची सर्व टीम असेल त्यांना प्रशासनाकडून शासनाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, त्यांना काय हवं आहे, यावर सुद्धा विचारणा केली आहे, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे.

२०२३ च्या तुलनेत क्राईम रेट शहरात कमी झाला

४००० कोटीच ड्रग्स पकडलं होत त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन केलं. ग्राउंड लेवलवर ड्रग्सवरती लक्ष ठेवले पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. २२९ कारवाई ड्रग्स प्रकरणी केली आहे, यात कारवाया वाढवा. ड्रग्समध्ये काम करताना पोलिसांना फ्री हॅंड आम्ही देणार आहोत. २०२३ च्या तुलनेत क्राईम रेट शहरात कमी झाला आहे. अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यावर देखील अनेक सुधारणा करणार आहोत. सायबर क्राईममध्ये देखील वाढ झाली आहे. याबाबत स्टाफ वाढवण्याचा सूचना दिल्या आहेत. मुंबई मध्ये संयुक्त इमारत सायबरसाठी आहे, तशीच पुण्यात देखील हवी अशी मागणी करण्यात येणार आहे आणि ती पुर्ण देखील केली जाईल, पोलिस प्रशासन आणि मुख्यमंत्री यांच्या मधला मी दुवा आहे, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.

पुणे पोलीस दलात ८५० नव्या जागा 

पुण्यात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. २०२३ पेक्षा २०२४ मध्ये गुन्हेगारी ५० टक्के कमी झाली आहे. कोयता गँग अशी काही अस्तित्वात नाही. ड्रग्स विक्रीवर कडक कारवाई झाली पाहिजे. काही गोष्टी घडल्या असतील अणि दादांनी त्यावर बोललं असेल तर त्यात काही गैर नाही. अजितदादांनी ज्या सुचना दिल्या आहेत, त्या प्रशासनाने पाळल्या पाहिजेत. यात दादांचं सुद्धा मार्गदर्शन घेवू. जिथ चुका होतील तिथं करवाई केलीच पाहिजे. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांचा आणि मुलांचं समोपदेशन करू तशा सूचना दिल्या आहेत. वाहतुकीसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि डीसीपी देण्यात यावी असा प्रस्ताव पाठवला आहे. पुणे पोलीस दलात ८५० नव्या जागा भरल्या जातील, अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss