बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येला २ महिने उलटले आहे. या हत्येत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. या हत्येत धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आल्याने धनंजय मुंडे यां नी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. भाजप आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, विरोधक आणि देशमुख कुटुंबीय हे सतत आंदोलन उपोषण करत आहे.
नुकताच दोन दिवस आधी संतोष देशमुख यांच्या हत्येचा फोटो समोर आले. पोलिसांनी आरोप पत्र न्यायालयात दाखल केला होता. त्या आरोपपत्रात पोलिसांनी ते फोटो न्यायालयात सादर केले होते. आता संजय शिरसाट यांनी फरार आरोपीवर शंका व्यक्त केली आहे.
संजय शिरसाट म्हणाले फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत आहे कि नाही हा मला डाउट आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. पण तो सापडत नाही, त्यामुळं त्याचा खून झाला असावा अशी शंका असल्याचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाही, त्यामुळं कारवाई करणं योग्य नाही असे शिरसाट म्हणाले. तपासात थोडे जरी आढळून आले तर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.