शनिवारी २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात दणदणीत विजय मिळवला. तब्बल २३६ जागा महायुतीने जिंकल्या तर केवळ ४९ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला बहुमत मिळालं. तर अपक्ष आणि इतर असे मिळून तिघांनी बाजी मारली. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांपैकी सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आमदार कोण आहेत, ते जाणून घेऊया.
सातारा जिल्ह्यातील आमदार : ०८
२५५ फलटण – सचिन पाटील (NCP)
२५६ वाई – मकरंद पाटील (NCP)
२५७ कोरेगाव – महेश शिंदे (NCP)
२५८ माण – जयकुमार गोरे (भाजप)
२५९ कराड उत्तर – मनोज घोरपडे (भाजप)
२६० कराड दक्षिण – अतुल भोसले (भाजप)
२६१ पाटण – शंभुराज देसाई (शिवसेना)
२६२ सातारा – शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार : ०५
२६३ दापोली – योगेश कदम (शिवसेना)
२६४ गुहागर – भास्कर जाधव (ठाकरे गट)
२६५ चिपळूण – शेखर निकम (NCP)
२६६ रत्नागिरी – उदय सामंत (शिवसेना)
२६७ राजापूर – किरण सामंत (शिवसेना)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार : ०३
२६८ कणकवली – नितेश राणे (भाजप)
२६९ कुडाळ – निलेश राणे (शिवसेना)
२७० सावंतवाडी – दीपक केसरकर (शिवसेना)
कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार : १०
२७१ चंदगड – शिवराज पाटील (अपक्ष)
२७२ राधानगरी – आनंदराव आबिटकर (शिवसेना)
२७३ कागल – हसन मुश्रीफ (NCP)
२७४ कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक (भाजप)
२७५ करवीर – चंद्रदीप नरके (शिवसेना)
२७६ कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर (शिवसेना)
२७७ शाहूवाडी – विनय कोरे (जन सुराज्य शक्ती)
२७८ हातकणंगले – अशोक माने (जनसुराज्य शक्ती)
२७९ इचलकरंजी – राहुल आवडे (भाजप)
२८० शिरोळ – राजेंद्र यड्रावकर (राजर्षी शाहू विकास आघाडी)
सांगली जिल्ह्यातील आमदार : ०८
२८१ मिरज – सुरेश खाडे (भाजप)
२८२ सांगली – सुधीर गाडगीळ (भाजप)
२८३ इस्लामपूर – जयंत पाटील (शरद पवार गट)
२८४ शिराळा – सत्यजित देशमुख (भाजप)
२८५ पलूस कडेगाव – विश्वजित कदम (काँग्रेस)
२८६ खानापूर – सुहास बाबर (शिवसेना)
२८७ तासगाव – कवटे महांकाळ रोहित पाटील (शरद पवार गट)
२८८ जत – गोपीचंद पडळकर (भाजप)
हे ही वाचा:
MLA List Thane 2024 : ठाणे जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघातून कोणते आमदार?