spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

आमदार सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी – प्राजक्ता माळी

काल परळीत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्राजक्ता माळीचा सत्कार धंनज मुंडे यांनी केला होता. बीडमधील हत्याप्रकाणाच्या राजकीय वादात मंत्री धंनजय मुंडेंच नाव घेतांना आमदार सुरेश धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. त्यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता मळीचे नाव घेतला होता. त्यानंतर आज अभिनेत्री आणि लेखिका प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी, असे तिने म्हंटले आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीच कंठ दाटून आलाय. यावेळी ती बोलली, माझ्या भावाने सोशल मीडिया बंद केला, आई रात्रभर झोपली नाही, आमच्या कुटुंबाला मोठा त्रास होत असल्याचे सांगत गेल्या दीड महिन्यांपासून मी हे सर्व सहन करत होते. मात्र, एका लोकप्रतिनिधीने माझं नाव घेतल्यामुळे मी आज समोर येऊन बोलत आहे, असे प्राजक्ता माळीने म्हटले.

पुढे ते बोलली, गेल्या दीड महिन्यांपासून हे सुरू आहे. माझ्यावर टीका होतेय पण मी शांत आहे. पण, मी शांत बसते म्हणजे माझी मूकसंमती नाही, असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषदेत बोलायला सुरुवात केली. आमदार सुरेस धस यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेत आहे, असेही प्राजक्ता हिने म्हटले. माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता. परळीला केवळ महिला कलाकारच येतात का, पुरुष कलाकार कधी गेल्याच नाहीत का परळीला. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही, तुम्ही महिला कलाकारांच्या चारित्र्यावर संशय घेत नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वावर देखील तुम्ही प्रश्न उपस्थित करते, असे म्हणत प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसेच, मी महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली असून कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केल्याचही प्राजक्त माळीने म्हटले.

महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचे मनोरंजन होतं राहते 

हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठल्या कुठे आमच्यावर बेतलेलं आहे. आपल्या कुठल्यातरी रागाच्या भरात कोणी काहीतरी बोलून जाते. त्यानंतर त्या दोन वाक्यांचे मीडिया हजार व्हिडिओ करते, तेवढेच शब्द पकडते आणि यूट्यूब चॅनेलवर हजार व्हिडिओज बनतात. मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर व्यक्त करण्यास भाग पाडलं जातं. मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे आणि हे चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचे मनोरंजन होतं राहते, अशा शब्दात प्राजक्त माळीने खंत व्यक्त केली.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss