Monday, December 4, 2023

Latest Posts

वसई – विरार महानगरपालिकेवर मनसेचा विक्रमी महामोर्चा

वसई विरारकरांच्या पाणी प्रश्नासाठी एक केस घ्यावी लागली तरी ती मी घेईन असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज विरार येथे केलं आहे.

वसई विरारकरांच्या पाणी प्रश्नासाठी एक केस घ्यावी लागली तरी ती मी घेईन असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज विरार येथे केलं आहे. वसई विरारकरांच्या पाण्यासाठी आज वसई विरार महानगरपालिकेवर महामोर्चा मनसेने काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व राजे ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केल आहे.

शहराला दररोज ३७२ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सुर्या प्रकल्प दोन अंतर्गत वसई विरार शहराला १६५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्यात पालिकेची विरारच्या काशिद कोपर पर्यंत पाईपलाईन टाकण्याचं काम झालं आहे. त्यामुळे जुलै महिन्यात ८० एमएलडी पाणी पुरवठा झाला पाहिजे होता. उर्वरित पाणी पुरवठ्याचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे ८० एमएलडी पाणी पुरवठा हा केवळ नेत्याच्या उद्घाटनाअभावी रखडला आहे.

 

वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात मुबलक पाणी आहे. सध्या वसई-विरारकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पातून अतिरिक्त १६५ एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यातील ८० एमएलडी आता मिळू शकते.

नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने अतिरिक्त पाणी वितरीत होत नाही आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आक्रमक झाले असताना, आज शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने पालिकेवर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. काही महिलांनी डोक्यावर कळशी घेवून या मोर्चात सहभागी झाले होते. येत्या पाच दिवसात वसई विरारकरांना अतिरिक्त मिळणार पाणी पुरवठा सुरू नाही केला, तर मनसेचे पदाधिकारी स्वतः पाणीपुरवठा सुरू करतील. त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होणार असल्याचे सांगून, यासाठी माझ्यावर एक केस झाली तरी चालेल असं आक्रमक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Latest Posts

Don't Miss