spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईत ३० हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात

Vidhan Sabha Election २०२४ : मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी कठोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून मुंबई पोलीस दलाने पाच अपर पोलीस आयुक्त, २० पोलीस उपआयुक्त, ८३ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह हजारांहून अधिक पोलीस अधिकारी २५ हजारांहून अधिक पोलीस अंमलदार,०३ दंगल नियंत्रण पथके फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला. तसेच वाहतूक विभागातमार्फत स्वतंत्रपणे १४४ अधिकारी व एक हजाराहून अधिक पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत चार हजारांहून अधिक गृहरक्षक दलाचे तैनात करण्यात आले आहे. या शिवाय महत्त्वाच्या ठिकाणी २६ केंद्रीय सुरक्षा दले / राज्य सुरक्षा दले यांची निवडणूक कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

मतदान केंद्रालगतच्या १०० मीटर परिसरात मोबाईल अथवा वायरलेस यंत्रणा, तसेच परिसरात बॅनर, ध्वनीक्षेपक, मेगाफोनचा वापर करण्यास बंदी आहे. याशिवाय मतदान केंद्र, परिसरात मतदार व निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणतीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अमलबजावणी काटेकोरपणे होईल. त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

विधानसभा निवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत रोख रक्कम, मूल्यवान धातू , दारू, अंमली पदार्थ इत्यादी सुमारे १७५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विविध कायद्याअंतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक पार पाडण्याकरीता एकूण ४४९२ जणांवर प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी करण्यात आले असून मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघात (मतदान केंद्र परिसर) व अन्यथा नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी मदतीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील मदत क्रमांक १००, १०३, ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss