spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

आईनेच आपल्या १० वर्षाच्या पोटच्या पोराला गळा आवळून संपवलं

एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाला ठार मारल्याची घटना घडली. ही घटना मुंबई उपनगरातील वांद्रे परिसरात गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. मृत मुलाचा नाव सर्वेश (वय १० वर्ष) आहे तर त्या महिलेचा नाव अभिलाषा औटी (वय ३६) वर्ष आहे. अभिलाषा औटी आला स्क्रिझोफेनिया हा आजार आहे. तिने आपला मुलगा सर्वेशचा वायरने गळा आवळत ठार मारले आहे. या घटनेमुळे येरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं

औटी कुटुंबीय हे वांद्रे पूर्वेला असणाऱ्या खेरवाडी परिसरातील वाय कॉलनीत राहत होते. सर्वेशचे वडील हे उप-सचिव पदी कार्यरत होते. गुरुवारी संध्याकाळी अभिलाषा आणि त्यांचा मुलगा सर्वेश हे दोघेच घरात होते. अभिलाषाला स्क्रिझोफेनिया आजार असल्याने तिची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. गुरुवारी काही कारणामुळे अभिलाषाला राग आला आणि तिचा संतापाचा पारा चांगलाच चढला. तिने रागाच्या भरात सर्वेशला खेचत बेडरुममध्ये नेले. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा लावून घेतला आणि एका वायरने सर्वेशचा गळा आवळला. या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी सर्वेशचे वडील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभिलाषा औटी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. अभिलाषाचे पती हे सरकारी कर्मचारी असून उप-सचिव पदी कार्यरत आहे. ते या घटनेने फारच खचून गेले असल्याची महिती पोलिसांनी दिली. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे खेरवाडी परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्क्रिझोफेनिया आजार नेमका काय?

स्क्रिझोफेनिया हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या आजाराच्या रुग्णांना वेगवेगळे भास होणे, बुद्धीभ्रंश आणि मनात विसंगत विचार येणे, असा त्रास जाणवतो. त्यामुळे या व्यक्तींचे वागणे सामान्य नसते. या आजाराच्या रुग्णांना दैनंदिन व्यवहारातील गोष्टी करणेही अवघड असते.

Latest Posts

Don't Miss