MSRTC: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी राज्यातील एसटी बसवर कर्नाटकात हल्ला झाल्यानंतर शनिवारी कर्नाटकला जाणाऱ्या सर्व राज्य परिवहन बसेस बंद करण्याचे आदेश दिले. बंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवर शुक्रवारी रात्री ९.१० वाजता चित्रदुर्गात कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांनी चालक भास्कर जाधव यांचा चेहऱ्यावरही काळे फासले आणि त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ कर्नाटक ला बस जाणार नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
या हल्ल्याप्रकरणी कर्नाटकात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “जोपर्यंत कर्नाटक सरकार या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत कर्नाटकला जाणारी बस सेवा पुन्हा सुरू केली जाणार नाही”, असे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. तसंच, एका मुलीला मराठीत उत्तर न दिल्याबद्दल कर्नाटकच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या कंडक्टरला बेळगावी मारहाण करण्यात आली. चित्रदुर्गात एमएसआरटीसी बसवरील हल्ला हा कंडक्टरवरील कथित हल्ल्याचा बदला होता की नाही हे स्पष्ट झालेले नाही. सरनाईक म्हणाले की, एमएसआरटीसी (MSRTC) बस चित्रदुर्ग ओलांडत असतानाच कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केला.
कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का? अशी विचारणा करत त्याला मारहाण करण्यात आली. चित्रदुर्ग जवळील ऐमंगळ टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. या घटनेमध्ये जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या घटनेच्या आधी काही वेळापूर्वीच बेळगावात एका एसटी कंडक्टरला मारहाण करण्यात आली होती. कंडक्टरला मराठी येत नसल्याने काही तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप होत होता. पण नंतर एका तरूणीशी गैरवर्तन केल्यावरून ही मारहाण झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी कर्नाटक बसच्या वाहकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime : मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेले ‘छावा’ पाहायला गेले न फसले