spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: ‘जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी’, लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, व्यावसायिक शिक्षण आणि उद्योग उभारणीस इच्छुक असलेल्या महिलांना आर्थिक परिस्थिती अभावी उद्योग सुरू करता येत नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. घरकाम करुन ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचं, असा प्रश्न होता. पण ‘लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला,” असे म्हणताना एक वृद्ध महिला गहिवरली. “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच ” ही योजना कधीही बंद पडणार नाही” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय,” असे सांगितले.

या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. “आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला,” असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले. या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “या मागणीचा जरुर विचार करू,” असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या भेटीचे आयोजन “रसिकाश्रय” संस्थेने केले. “या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. “मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहील, हे ऐकून समाधान झाल्याचे एका महिलेने सांगितले.

बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी’ कार्यक्रम

गरजू महिलांना उद्योगपूरक साधने पुरविण्याच्या सहाय्यासोबतच उद्योग कायम टिकविणे आणि वाढविणे यासाठी आर्थिक साक्षरही करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांनी गरजू महिलांना उद्योगपूरक वस्तुंच्या वितरणाबाबत महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी अभिनंदन केले. जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी या कार्यक्रमाअंतर्गत १५७ महिलांना चर्चगेट येथील वालचंद हिराचंद हॉल येथे उद्योगपूरक वस्तुंचे वितरण महिला व बालविकास मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक अनु अग्रवाल, बॉबकार्डचे (बँक ऑफ बडोदाची उपकंपनी) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र राय, मानव संसाधन प्रमुख रवी खन्ना, सीएसआरचे विभागीय अधिकारी विपुल बरोट, युनायटेड वे मुंबईचे उपाध्यक्ष अनिल परमार, मुख्य कार्यकारी अधिकारी सना शेख, व्यवस्थापकीय सहायक चिन्मय पाटील यांच्यासह अधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, व्यावसायिक शिक्षण आणि उद्योग उभारणीस इच्छुक असलेल्या महिलांना आर्थिक परिस्थिती अभावी उद्योग सुरू करता येत नाही. अशा महिलांना बॉबकार्ड उद्योगपूरक वस्तु देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास सहकार्य करीत आहे. यानंतर त्यांना प्रशिक्षण देणेही महत्वाचे आहे, त्यांना भविष्यात उद्योगवाढीसाठी आर्थिक साक्षर करणे, गुंतवणुकीचे आणि बचतीच्या पर्यायांची माहिती देणे महत्वाचे असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. या अंतर्गत या १५७ महिलांना पुढील सहा महिने व्यवसाय कौशल्य, उद्योजकता याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हे ही वाचा:

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अनेक पदांची भरती, कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे Aditi Tatkare यांचे आवाहन

मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले अधिकारी, CM Fadnavis यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss