spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Mukhyamantri mazi ladki bahin yojana: ‘हे’ निकष मोडले असतील तर आज पासून लाडक्या बहिणींचे पैसे होणार बंद

ज्या महिलांचं कुटुंब आयकर (Income Tax) भरतो अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलाकडे चार चाकी वाहन (4 wheelar) आहे, त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील (Aadhar Card) नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे.

Mukhyamantri mazi ladki bahin yojana : महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेमुळे महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र सत्तेमध्ये येताच महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचं आता सरकारला वाटत आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे तो कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे.

आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यावेक्षीका लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तेव्हा काही निकष ठरविण्यात आले होते. मात्र या नियमांची पायमल्ली करून अनेक महिलांनी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे या अर्जांची छाननी न झाल्याने अनेक अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता सरकारने यावर करडी नजर ठेवली आहे. चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही चारचाकी महिलेच्या नावावर नसेल, मात्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तरीही त्यांना या योजनेतून बाद केलं जाईल. यासाठी लाडक्या बहिणांच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यावेक्षीका घरोघरी जाऊन चारचाकी कार असल्याची पडताळणी करणार आहेत.

तसेच, ज्या महिलांचं कुटुंब आयकर (Income Tax) भरतो अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलाकडे चार चाकी वाहन (4 wheelar) आहे, त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील (Aadhar Card) नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहीणीचा लाभ घेता येणार नाही.या सर्व निकषांची पडताळणी अंगणवाडी सेविका आता घरी येऊन करणार आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण केंद्रस्थानी असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा : 

बॉलीवूड अभिनेत्री Priyanka Chopra भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss