spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

मुंबई पोलिसांकडून कॉपी करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

आता परीक्षांचा सत्र सुरु होणार असून कॉपी करणारे देखील कॉपी कशी करायची या कमला लागले आहेत. आपल्याला कॉपी करण्याच्या नवं नवीन टेकनिक ऐकायला मिळतात. आता मुंबई पोलिसांच्या लेखी परीक्षेत ‘मुन्ना भाई MBBS’ स्टाईलने कॉपी करू पाहणाऱ्या प्रशिक्षणार्थीला पोलिसांनाही अटक केली आहे. आशीवरच्या रायगड मिलिटरी स्कूल, हॉल क्रमांक ३१२ न्यू लिंक रोड, ओशिवरा जोगेश्वरी पश्चिम या परीक्षा सेंटरवर हा प्रकार घडला.

 

मायक्रो फोन डिवाइस द्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता. यात कृष्णा दळवी या 22 वर्षीय प्रशिक्षणार्थीला पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा दळवी हा पेपर लिहीत असताना इअर मायक्रो फोन डिवाइसच्या मदतीने पेपरात कॉपी करत होता. कृष्णाच्या संशयित हालचालीवर परीक्षेदरम्यान सुपरवायझरचे काम करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आला. इअर मायक्रो फोन डिवाईस या उपकरणाद्वारे त्याचे साथीदार सचिन बावस्कर, प्रदीप राजपूत हे त्याला पेपरातील उत्तर सोडवण्यास मदत करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या तिघांच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कुष्णाकडून एक मोबाइल सिमकार्ड, मोबाइल आणि कॉपी करण्यासाठी वापरण्यात आलेले इअर मायक्रो फोन डिवाइस जप्त केले आहे. कृष्णा दळवी हा मूळचा जालनाच्या भोकरदन येथील मानपूर गावचा रहिवाशी आहे.

मुंबई पोलिसांकडून वाहनचालक कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान कृष्णा दळवी याच्या संशयास्पद हालचाली पोलीस कर्मचाऱ्याच्याला दिसून आल्या. कृष्णाच्या कानात असलेल्या डिवाइस कुणाला दिसून येणार नाही अशा पद्धतीन बसवण्यात आला होता. मात्र, त्याचा डाव फसला आणि अटकेत जावं लागलं आहे.

Latest Posts

Don't Miss