spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

होळी आणि धुलीवंदनाच्या मुंबई पोलिसांनी कसली कंबर; ड्रक एण्ड ड्राईव्ह मोहिम; काडेकोड बंदोबस्त

बुरा ना मानो होली है…. असं म्हणत आपण होळी  सण साजरा करतो. एक- मेकांना रंग लावतो. प्राण पोळी खातो. मात्र होळीच्या दिवशी अनेक घटना घडतात. त्याचीच काळजी घेत मुंबई पोलिसांनी आपली कंबर चांगलीच कसली आहे.

होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये मुंबई पोलिसांनी काडेकोड बंदोबस्त लावला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात रस्त्या रस्त्यावर चौकात पोलिसांच्या टीम बंदोबस्ताला जुंपण्यात आल्या आहेत. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर पाळत ठेवण्यात आली असून पेट्रोलिंग सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनी महत्वाच्या ठिकाणांवर एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई पोलिसांना चांगली कंबर कसली आहे. मुंबईतील संवेदनशील विभागात अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एसटी आणि बेस्टच्या बसेसना सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच लोकल ट्रेन आणि मेट्रो तसेच मोनोरेलची खास काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मुंबई आणि उपनगरात ०७ अपर पोलीस आयुक्त, १९ पोलीस उप आयुक्त, ५१ सहायक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. ताईच १७६७ पोलीस अधिकारी अंमलदार बंदोबस्तकरीता तैनात करण्यात आले आहेत.

ड्रक एण्ड ड्राईव्ह मोहिम राबविणार
होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी अनेकदा अंगावर जबदस्तीने रंग उडविल्याने वादावादीचे प्रकार घडतात. त्यामुळे वादाचे पर्यावसन कोणत्याही धार्मिक तेढीत होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. महत्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, क्युआरटी टीम, बीडीडीएस टीम आणि होमगार्डसची तैनाती करण्यात आली आहे. तसेच मद्यप्राशन करुन दुचाकी आणि कार चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके तैनात करण्यात आले आहेत. वाहतूकीच्या नियमांचे पालन होण्यासाठी ठीक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर, महिलांशी गैरवर्तवणूक करणाऱ्यांवर आणि अनधिकृत मद्य विक्री तसेच अंमली पदार्थांचे सेवन तसेच विक्री करणाऱ्यांवरच कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीसांनी दिले आहेत.

Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss