spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Mumbai Pune expressway accident : मुंबई पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात, उभ्या ट्रकवर बस आदळली

Mumbai Pune : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ शनिवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना असलेल्या मार्गावर हा अपघात झाला. मुंबई लेनवर उभ्या असणाऱ्या ट्रकवर खासगी बस आदळली. या अपघातामध्ये बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आय आर बी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. वाहतूक पोलीस मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोल्हापूर येथे फुटबॉल ट्रॉफी जिंकून परतणारी टीम या अपघातात बाधीत झाली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या टीममधील चार मुलींना एमजीएम हॉस्पिटल येथे शिफ्ट केले आहे. उर्वरित सर्वांना मुंबई येथे पर्यायी वाहनाने पाठवण्यात आले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात दुसरा अपघात झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. गणपती उत्सव काळात परशुराम घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. मात्र अजूनही पूर्ण दरड हटवण्याचे काम महामार्ग प्रशासनाने केले नाही. महामार्गावर आजही मलबा कायम आहे. यामुळेच या महामार्गावर अपघातीच्या घटना घडतात. आता या ठिकाणी अपघात झाला आणि महामार्ग पूर्ण बंद पडला आहे. सध्या एकेरी वाहतूक चालू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अपघातानंतर परशुराम घाटातील वाहतूक ठप्प आहे. मात्र, एकेरी वाहतूक चालू करण्यात महामार्ग पोलिसांना यश आले आहे. घाटातील एक लाईन वाहतुकीसाठी यापूर्वीच होती बंद होती. तसेच दुसरी लाईन रस्ता क्रॅक झाल्यामुळे मागील पंधरा दिवसापासून बंद आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांच्या टीम परशुराम घाटात दाखल झाल्या आहेत.

हे ही वाचा:

PM Narendra Modi LIVE: जिथे काँग्रेसचे सरकार बनते ते राज्य काँग्रेसच्या राजघराण्याचे एटीएम बनते; पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss