महाराष्ट्रातील पश्चिम रेल्वेने वैध तिकिटे असलेल्या सर्व प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन, मेल, एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनमध्ये तपासणी मोहीम सुरू केली आहे. या गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
गेल्या १० महिन्यांत या मोहिमेदरम्यान ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे. तपासणी मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात तिकीटविना प्रवासी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे १०४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली, तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते डिसेंबर २०२४ पर्यंत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या, ज्यातून 104.45 कोटी रुपये जमा झाले. मुंबई उपनगरीय विभागातून मिळालेल्या 33.98 कोटी रुपयांचाही समावेश आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्या मते, डिसेंबर २०२४ मध्ये, बुक न केलेल्या सामानासह १.८९ लाख तिकीटविहीन/अनियमित प्रवाशांचा शोध घेऊन १०.९८ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय डिसेंबर महिन्यातही पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ८५ हजार प्रकरणे शोधून ३.३५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
एसी लोकल गाड्यांमधील अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी नियमित सरप्राईज तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमांच्या परिणामी, एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ४५,००० हून अधिक अनधिकृत प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. लोकांनी विना तिकीट प्रवास करू नये आणि कोणताही त्रास न होता आपला प्रवास यशस्वी करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.
हे ही वाचा:
रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो