Saturday, April 20, 2024

Latest Posts

आज रात्रीपासून पश्चिम मार्गावर तब्ब्ल १४ तासांचा Special Block, उद्या घराबाहेर जाणार असाल तर वेळापत्रक घ्या जाणून

उद्या दिनांक ४ जुने रोजी तुम्ही कुठे जाणार असाल त सर्वात आधी लोकल वेळा वेळापत्रक पूर्णपणे तपासा मगच घराबाहेर निघा. कारण उद्या पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक हा घेण्यात येणार आहे.

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्हाला उद्या दिनांक ४ जून (रविवार) रोजी लोकल ट्रेनने प्रवास करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जर उदयाला तुम्हाला कुठे फिरायला जायचे असेल तर त्याच नियोजन हे आजच करा कारण रविवारी पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक हा घेण्यात येणार आहे.

उद्या दिनांक ४ जुने रोजी तुम्ही कुठे जाणार असाल त सर्वात आधी लोकल वेळा वेळापत्रक पूर्णपणे तपासा मगच घराबाहेर निघा. कारण उद्या पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक हा घेण्यात येणार आहे. जोगेश्वरी (Jogeshwari) ते गोरेगावदरम्यान (Goregaon) हा विशेष मेगाब्लॉक तब्ब्ल १४ तासांचा असणार आहे. आज दिनांक ३ जूनच्या (शनिवारी) रात्रीपासूनच हा मेगाब्लॉक लागू करण्यात येणार आहे. आज रात्री १२ पासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत हा विशेष मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock News) घेण्यात येणार आहे. या कालावधीत लोकलच्या वेळापत्रकात (Mumbai Local Schedule) अनेक बदल करण्यात आले असून काही लोकल रद्द (Mumbai Local Canceled) करण्यात आल्या आहेत.

  • हा ब्लॉक चालू होण्याच्या आधी डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल सीएसएमटी गोरेगाव रात्री ११.५४ वाजता सुटेल आणि रात्री १२.४९ वाजता पोहचले तर अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल गोरेगावहून रात्री ११.०६ वाजता सुटेल आणि रात्री १२.०१ वाजता सीएसएमटी येथे पोहचेल.
  • तसेच दुपारी १.५२ वाजेपर्यंतच्या सीएएसएमटी-गोरेगाव लोकल रद्द करण्यात आल्या आहे.
  • ब्लॉक कालावधीत वांद्रे-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
  • चर्चगेटवरून दुपारी १२.१६ वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली लोकल आणि दुपारी २.५० वाजताची चर्चगेट-बोरिवली लोकल विरारपर्यंत धावेल.
  • बोरिवलीवरून दुपारी १.१४ आणि दुपारी ३.४० वाजता सुटणारी बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी विरार-चर्चगेट दुपारी १.४५ आणि दुपारी ४.१५ वाजता दोन अतिरिक्त जलद लोकल धावतील.
  • ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस १० ते १५ मिनिटं विलंबानं धावतील. तसेच राम मंदिर स्थानकावर अप आणि डाऊनला कोणतीही लोकल उपलब्ध नसेल.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss