Thursday, April 25, 2024

Latest Posts

५४५ भाडेकरू झाले बेघर, तब्बल १५ इमारतींना MHADA ची नोटीस!

नुकतीच म्हाडाने मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या तब्बल १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे.

नुकतीच म्हाडाने मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या तब्बल १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये गेल्यावर्षी मोडकळीस आलेल्या ७ इमारतींचा सुद्धा समावेश आहे. यामुळे होणाऱ्या कार्यवाहीस रहिवाशांनी सहकार्य करावे तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन इमारत दुरूस्ती मंडळाने रहिवास्यांना केलं आहे.

मुंबई शहरातील खूप जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून या सर्वेक्षणात मुंबईतील १५ इमारती धोकादायक आढळून आल्या. हे सर्वेक्षण म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अंतर्गत करण्यात आले आहे. म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत नेमक्या कोणत्या १५ इमारतींचा समावेश आहे ते आपण पाहुयात.

म्हाडाच्या १५ धोकादायक इमारतींची यादी पुढीलप्रमाणे –

इमारत क्रमांक ४-४ ए,नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक ७४ निझाम स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक ४२, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक ६१-६१ ए , मस्जिद स्ट्रीट
इमारत क्रमांक २१२ जे पांजरपोळ लेन
इमारत क्रमांक १७३-१७५-१७९ व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी
इमारत क्रमांक २-४-६ नानुभाई देसाई रोड, मुंबई
इमारत क्रमांक १-२३ नानुभाई देसाई रोड, मुंबई
इमारत क्रमांक ३५१ ए, जे एस एस रोड मुंबई
इमारत क्रमांक ३८७-३९१ बदामवाडी, व्ही .पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक १७ नारायण निवास , निकटवाडी
इमारत क्रमांक ३१ सी व ३३ ए ,आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग, गिरगावचौपाटी (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक १०४-१०६ ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)
इमारत क्रमांक ४० कामाठीपुरा ४ थी गल्ली
अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस – ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)

या धोकादायक इमारतींमध्ये एकूण ५४५ रहिवासी राहत आहेत. या मध्ये ४२४ निवासी तसेच १२१ अनिवासी यांचा समावेश आहे. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाद्वारे १५५ रहिवाशांनी स्वतःची निवार्‍याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत २१ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच उर्वरित रहिवाश्यांना लवकरात लवकर स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. याशिवाय २२२ रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे नियोजन करण्यात आले आहे. व स्थलांतर जकारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या दरम्यान रहिवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन इमारत दुरूस्ती मंडळाने रहिवाशांना केलं आहे.

हे ही वाचा:

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Gautami Patil चा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss