Friday, December 1, 2023

Latest Posts

वाधवान बंधूंची ७० कोटींची मालमत्ता आणि महागड्या वस्तू ईडीकडून जप्त

वाधवान बंधूंची ७० कोटींची मालमत्ता आणि महागड्या वस्तू ईडीकडून जप्त

ED ने वाधवान बंधूंना मोठा झटका दिला आहे. वाधवान बंधुंवर ईडीने मध्यरात्री कारवाई केली आहे. या कारवाईत वाधवान बंधूंची ७० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. ईडीने यापूर्वी ही वाधवान बंधूंवर कारवाई केली होती. आतापर्यंत ईडीने केलेल्या कारवाईतून वाधवान बंधूंची २ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली गेली आहे.काल मध्यरात्री ईडीने मोठी कारवाई केली असून डीएचएफएल (DHFL) घोटाळा प्रकरणात वाधवान कुटुंबीयांची ७० कोटी ३९ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे, या जप्त केलेल्या मालमत्तेत खूप महागड्या गोष्टींचा समावेश आहे. या जप्त केलेल्या गोष्टींमध्ये २८ कोटींच्या पेंटिंग्ज, ५ कोटींचे हिरे, वांद्रे परिसरातील १७ कोटींचे दोन फ्लॅट, ५ कोटींची महागडी घड्याळे आणि हेलिकॉप्टवरचे ९ कोटी अश्या विविध महाग असलेल्या मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत.ईडीने धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांची मालमत्ता जप्त केलेली आहे.

काय आहे हा वाधवान बंधूंचा घोटाळा –

डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान आणि त्यांचे बंधु धीरज वाधवान यांच्यासह अन्य आरोपींनी यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) च्या नेतृत्वातील बँकेत कंसोर्टियमची फसवणूक करण्यासाठी षडयंत्र रचल्याचं ईडीचं म्हणणं (ED)आहे. ईडीने म्ह्टल्याप्रमाणे या कथित षडयंत्राच्या माध्यमातून वाधवान बंधू आणि अन्य बँकांच्या समूहांनी ४२,८७१.४२ कोटींच्या मोठ्या कर्जाला मंजुरी देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं होतं तसेच डीएचएफएलच्या खात्यात षडयंत्र करून मोठी रक्कम हडपून त्याचा दुरुपयोग करण्यात आला होता. त्यामुळे ग्राहकांचे ३४,६१५ कोटींचे नुकसान झाले आहे, असंही ईडीने यात म्हटलं आहे.

गेल्यावर्षीही करण्यात आली होती धाड –

गेल्यावर्षी मुंबईत सीबीआयने डीएचएफएल(DHFL) घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली होती, त्यावेळी सीबीआयने वाधवान बंधूंची १२ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त केली होती. या जप्त केल्या गेलेल्या वस्तूंमध्ये महागडी घड्याळे, पेंटिंगस, हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने यांचा समावेश होता, त्यानंतर पुन्हा आज याच प्रकरणी त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. या धाडीनंतर सीबीआयने दहाहून अधिक लोकांना आरोपी बनवलं होतं.

हे ही वाचा : 

‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवीन ट्विस्ट,सायली-अर्जुन होणार आई-बाबा?

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीरालाही उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss