spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

शिवडीतील कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई, टपाली मतदानाचा फोटो पोलिसांकडूनच व्हायरल

Maharashtra Vidhan Sabha Election २०२४ : सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, २० नोव्हेंबर या दिवशी पोलीस आणि सरकारी कर्मचारी नवडणुकीच्या कर्तव्यावर असल्याने त्यांना मतदान करणे शक्य नसते. या कर्तव्यच्या पार्श्ववभूमीवर टपाली मतदानाद्वारे पोलिसांना मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोग्याने उपलब्ध करून दिली आहे. पण, या मतदान दरम्यान टपाली मतदान प्रक्रियेची गोपिनीयता भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलीस दलामधील आणखी एका शिपायांवर टपाली मतदान प्रक्रियेची गोपिनीयता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपायांनी टपाली मतदानाचा फोटो गावाकडे व्हॅटसअप द्वारे पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. या घडलेल्या प्रकरणाबाबत पोलीस शिपाया विरोधात शिवडी पोलीस ठाण्यामध्ये कलम २२३ सह लोकप्रतिनिधी अधिनियम कलम १२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिपाई रियाझ पठाण हा मूळचा साताराच्या कोरेगावचा असून, सदर पोलीस कर्मचारी शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांचे १४ नोव्हेंबर रोजी २५७ कोरेगांव विधानसभा मतदारसंघ सातारासाठी टपाली मतदान घेण्यात आले. पोलीस कर्मचारी रियाझ यांनी त्यावेळी टपाली मतदान केल्यानंतर या मतपत्रिकेचा फोटो काढून व्हाटसअँप द्वारे गावी नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला पाठवला. या व्हायरल झालेल्या टपाली मतपत्रिकेची चौकशी केल्यानंतर ही टपाली मतपत्रिका १८४ भायखळा विधानसभा पोस्टल बॅलेट फॅसिलिटेशन सेंटर येथून प्राप्त झाल्याचे समोर आले आहे. तसेच पुढील मिळालेल्या माहितीनुसार हा अर्ज मुंबई मतदार यादी क्रमांक ४७ मधील या पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आला होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस चौकशी दरम्यान केलेल्या गुन्हयाची कबूली दिली. या केलेल्या गुन्हा प्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही अशाच प्रकारे टपाली मतदान प्रक्रियेची गावदेवी पोलीस ठाण्यात गोपिनीयता भंग केल्या प्रकरणी एका पोलीस शिपयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत शहरातील आगामी विधानसभेच्या पार्श्ववभूमीवर ६ हजार ५६७ पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबई शहर, जिल्ह्यातील १० मतदार संघात सहा हजार ५६७ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये कुलाबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले असून, येथे एक हजार ८७९ जणांनी मतदान केले. यानंतर वडाळा मतदार संघात एक हजार ४०७ पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच मलबार हिलमध्ये एक हजार २४२, वरळीत ४२, भायखळ्यामध्ये ७६४, धारावीत २७४, सायन कोळीवाड्यात ३२४, मुंबादेवी ५१७ आणि शिवडी मतदार संघात ११८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाची मुदत होती. तसेच १४ नोव्हेंबर रोजी धारावी मतदारसंघात टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, तर १७ नोव्हेंबर रोजी वरळी, शिवडी वडाळा, मतदार संघात टपाली मतदान सुरु होते.

हे ही वाचा:

चिंचवडला भिडलेत जगताप विरूध्द कलाटे, कोणाला मिळणार मतदारांची कलटी?

मोठी बातमी:अबू आझमीला आला हृदयविकाराचा झटका; प्रकुर्ती नाजूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss