Thursday, November 30, 2023

Latest Posts

केरळमध्ये झालेल्या सीरीयल बॉम्ब ब्लास्टच्या घटनेनंतर मुंबई हायअलर्ट!

केरळमध्ये झालेल्या स्फोटनंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये आज सकाळी झालेल्या सीरीयल बॉम्ब ब्लास्टचा घटनेनंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात खाबड हाउस इमारतीमध्ये यहुदी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात

केरळमध्ये झालेल्या स्फोटनंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये आज सकाळी झालेल्या सीरीयल बॉम्ब ब्लास्टचा घटनेनंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात खाबड हाउस इमारतीमध्ये यहुदी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळीही दहशतवाद्यांनी खाबड हाउस इमारतीवरला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर नेहमी या इमारतीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतो, मात्र आज केरळमध्ये झालेल्या सीरीयल बॉम्बब्लास्टच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी खाबड हाउस इमारतीच्या गल्लीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. खाबड इमारतीच्या गल्लीमध्ये जाणारा एक-एक गाडीचा आणि नागरिकांचा पोलीस कसून चौकशी करत आहे.

 

केरळात बॉम्बस्फोट, मुंबईत हायअलर्ट
केरळमध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात येत आहे. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे. केरळमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईसह, पुणे आणि दिल्लीतही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळ साखळी बॉम्बस्फोटाने हादरलं
आज सकाळी केरळ एका मागोमाग एक साखळी स्फोटांनी हादरलं. केरळमध्ये आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट झाला. यहुदी समाजाच्या प्रार्थनास्थळामध्ये सीरियल बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या 35 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss