spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईतील चारही धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा

मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस पडत आहे. राज्यात सर्वच ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस पडत आहे. राज्यात सर्वच ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. राज्यातील धरणात कमी प्रमाणात पाणी साठा झाल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. सध्या राज्यातील धरणांमध्ये ०.६६ टक्के एवढेच पाणीसाठा आहे. तर २४ तासात पडलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात ०.७७ टक्के पाणीसाठा वाढला आहे. २०२२ मध्ये राज्यातील धरणांमध्ये ८५.७१ टक्के पाणीसाठा होता. मुंबईतील चार धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे.

उजनी (Ujni) धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता उजनी धरणात १८.२८ टक्के पाणीसाठा आहे. या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी १०० टक्के पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात शेतीसाठी पाणी मिळाले होते. पण यावर्षी कमी प्रमाणात पडलेल्या पावसामुळे त्याचे नियोजन जल सिंचन विभागाकडे देण्यात आले आहे. तसेच जायकवाडी धरणामध्ये (Jayakwadi Dam) ३२.५५ टक्के जलसाठा आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग गोदावरीमध्ये होत असल्याने हे धरण मोठ्या प्रमाणावर भरत. मागील वर्षी याच वेळी जायकवाडी धरण ९४ टक्के भरलं होत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि शेतकऱ्यांची चिंता मिटली होती. पण यावर्षी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. कोकण (Kokan) विभागातील धरणांमध्ये ९२.२५ टक्के पाणीसाठा आहे. नाशिक मधील धरणामध्ये गेल्या २४ तासात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये ७९.१० टक्के जलसाठा तर अमरावती विभागातील धरणांमध्ये ७२. २८ टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणात मागच्या वर्षी याचवेळी९५. ०३ टक्के पाणीसाठा होता, आज कोयना धरणात ८०. ६८ टक्के जलसाठा आहे.मुंबईतील सातही तलावात ९२.२० टक्के जलसाठा आहे. तसेच मुंबईतील चारही तलाव १०० टक्के भरली आहेत. तुलसी, विहार, तानसा आणि मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

एक महिन्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात पुन्हा हजेरी लावली आहे. पालघर जिह्ल्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. पावसाच्या पुन्हा येण्याने शेतकरी सुखावला आहे. सप्टेंबर महिन्यातील पाऊस शेती पिकांसाठी पोषक असतो. धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पालघर जिह्ल्यात धामणी आणि कवडास उन्नेयी बंधारा ही दोन प्रमुख धरण आहेत. डहाणू नगरपरीषद, तारापूर अणूऊर्जा प्रकल्प, बीएआरसी, तारापूर औद्योगिक वसाहत, पालघर नगरपरीषद यासोबतच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला याच दोन धरणांतून पाणीसाठा केला जातो.

Latest Posts

Don't Miss