मुंबई उपनगरातील भांडुप परिसरात ड्रीम्स मॉलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचले असून या साचलेल्या पाण्यात आज मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही. याबाबाबत माहिती मिळाल्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भांडुप पश्चिमला रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या ड्रीम्स मॉल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. या मॉलमध्ये अगदी मोजकीची दुकाने आणि कॉल सेंटर होते. पावसाळयात या मॉलमध्ये पाणी शिरते त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी या मॉलमधून काढता पाय घेतला होता. त्यामुळे या मॉलमध्ये लोकांची फारशी ये-जा नव्हती. मध्यंतरी ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या एका रुग्णालयाला भीषण आग लागली होती. त्यामुळे येथील रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. आता अशातच या मॉलमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला नेमकी कोण होती, ती याठिकाणी का आली होती, तिचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न याघटनेनंतर उपस्थित झाले आहेत. आता याबाबतीत आता पोलीस तपासातून काय माहिती समोर येणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंट या ठिकाणी पाण्यात मृतदेह मिळालेल्या अनोळखी महिलेचे वय साधारण ३० ते ३५ इतके असेल. सदरचा मृतदेह मुलुंड जनरल हॉस्पिटल याठिकाणी भांडुप वन मोबाईलच्या मदतीने पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेणे सुरु आहे.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत