हातावर पोट असलेल्या ‘बॅकस्टेज आर्टिस्ट’चे कोरोनाकाळात प्रचंड हाल झाले. कलावंतांचे कलाप्रेमी आमदार आशिष शेलार या कठीण काळात ‘बॅकस्टेज आर्टिस्ट’च्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे कलाकार प्रचार मैदानात उतरले. सोमवारी सकाळी 10 वाजता वांद्रे पश्चिम मतदारसंघातील सांताक्रूझ येथील हायलाईफ मॉलपासून प्रचार फेरीला सुरुवात झाली. मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी वांद्र्यात अवघी कलाश्रुष्टी अवतरल्याचे पहायला मिळाले. मराठी आणि हिंदी कलाविश्वातील दिग्गज कलाकारांनी शेलार यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. पुढे खोतवाडी, संभाजी मैदान, गरोडिया नगर, मिलन सबवे रोड, साने गुरुजी रोड, दौलत नगर, शास्त्रीनगर, ओल्ड पोलीस क्वार्टर, जुहू रोड, एस.बी पाटील मार्ग, गजधन बांध, सिद्धिविनायक मंदिर, मरु आई मंदिर, शंकर व्यायाम शाळा, दांडपाडा नाका, सी डी मार्ग, दांडा नाका येथे पोचून श्रीराम मंदिर रोडजवळ पदयात्रेची समाप्ती झाली.
नेता आणि अभिनेता यांचं नातं फार वेगळं असतं. ॲड. आशिष शेलारांनी कोरोनाच्या काळात बॅकस्टेज आर्टिस्टला स्वतःहून मदत पोहचवली. आदरणीय आशा ताईंपासून अनेकांशी त्यांचे संबंध इतके चांगले आहेत, त्यामुळे आम्हाला हा नेता हवाहवासा वाटतो, अशी प्रतिक्रिया यावेळी अभिनेता अभिजित खांडकेकर यांनी दिली. आशिषजींनी केलेलं कार्य लोकांनी गौरवलेलं आहे. गेले दोन टर्म आशिषजी निवडून येत आहेत यावेळीही ते निवडून येतील अशी मला खात्री असल्याचे अभिनेते सचित पाटील म्हणाले.
कलाप्रेमी माणूस, कलेवर, कलाकारांवर आणि सगळ्यांवरच आशिष शेलार यांचा जीव आहे. त्यामुळे चांगल्या माणसांच आणि त्यांच्यामुळे इतरांच कल्याण व्हावं, यासाठी आशिष शेलार यांना माझा पाठिंबा असल्याचे विशाखा सुभेदार यांनी सांगितले. ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेते अजिंक्य देव, शरद पोंक्षे, नंदेश उमप, पुष्कर श्रोत्री, वैभव तत्ववादी, आदिनाथ कोठारे, अभिनय बेर्डे, अभिनेत्री अमृता खानविलकर, श्रुती मराठे, मृण्मयी देशपांडे, दिग्दर्शक विजू माने, विनोदवीर अरुण कदम, प्रभाकर मोरे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, गौरव मोरे यांच्यासह दिग्गज कलाकार आमदार आशिष शेलार यांच्या प्रचारात सहभागी झाले.
ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर म्हणाले, आशिष शेलार हे माझे लहान भाऊ आहेत. ते लहान असल्यापासून मी त्यांना ओळखतो. वांद्र्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत मी जवळून पहिली आहे. त्यामुळे ते विजयी होतील, यात तिळमात्रही शंका नाही. तर, ॲड. आशिष शेलारांसारखा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत आमदार आम्हाला हवा आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिली.
हे ही वाचा:
विरोधक प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत वारीस पठाण यांना अश्रू अनावर
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.