spot_img
spot_img

Latest Posts

ऑनलाईन गेमिंगच्या मुद्द्यावरुन Sachin Tendulkar विरोधात बच्चू कडू यांचे आंदोलन, भारतरत्न हा जुगाररत्न…

सध्या मुंबईत (Mumbai News) एक जोरदार आंदोलन हे सुरु आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत.

सध्या मुंबईत (Mumbai News) एक जोरदार आंदोलन हे सुरु आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमिंगची (Online Gaming) जाहीरात करतो आणि याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरकडे भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत त्यांनी दिली होती. मात्र, तोपर्यंत सचिन तेंडुलकरकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे आता बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू स्वत: आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच, आता सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं आहे. बच्चू कडूंनी काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरने केलेल्या एका जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरला मानणाऱ्या तरुणाईवर परिणाम होत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरनं एकतर या जाहिराती सोडाव्यात किंवा त्याला देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार तरी त्यानं परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. याच मागणीसाठी आज प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर जमले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत बच्चू कडू व काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

बच्चू कडू म्हणाले की, “खरं तर आम्हाला बरेच फोन, मेसेज येत आहेत. काही ठिकाणी तर पैसा गुंतवून या जुगारावर लावला आहे. ऑनलाईन गेमिंगची तुम्ही जर जाहीरात करताय, तर मग मटक्याचीही करा, ते कशाला सोडताय? भारतरत्न असल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. ते फक्त क्रिकेटर असते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. या देशात भगतसिंहांना भारतरत्न मिळाला नाही, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. मग ज्यांना भारतरत्न मिळाला ते जर गैरफायदा घेत आहेत.” “या जाहिराती करणारे इतर सेलिब्रिटी हे भारतरत्न नाहीयेत. भारतरत्न भगतसिंगांना मिळाला नाही, आण्णाभाऊ साठेंना मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. फक्त सचिन तेंडुलकर हा आमचा विषय नाही. भारतरत्न हा आमचा विषय आहे. भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये. आम्ही वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे”, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

Asia Cup 2023, भारतीय टीमला मोठा झटका, केएल राहुल संघाबाहेर ‘या’ खेळाडूला मिळणार संधी…

बच्चू कडू यांनी केली Sachin Tendulkar कडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss