Saturday, June 3, 2023

Latest Posts

बेस्ट तर्फे वीज ग्राहकांना करण्यात आले आवाहन, पावसाळ्यात…

मुंबईत पावसाळयामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे तसेच वीजेचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता असते.

मुंबईत पावसाळयामध्ये विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे तसेच वीजेचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता असते. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी बेस्ट उपक्रम फक्त प्रतिबंधात्मक उपाय योजनाच करत नाही तर आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जागोजागी अतिरिक्त कर्मचा-यांची नेमणूक करते. पावसाळयामध्ये अनेक ठिकाणी पाणी साठणे व वाहतुकीची कोंडी होणे यामुळे खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब होऊ शकतो.

ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणार्थ बेस्ट उपक्रमातर्फे आठवडयाच्या सर्व दिवशी रात्रंदिवस (२४ तास) वितळतार नियंत्रण कक्ष’ (फ्युज कंट्रोल) कार्यरत आहेत. सदर नियंत्रण कक्षात तक्रार नोंदवताना वीजग्राहकांनी त्यांचा वीजग्राहक क्रमांक अथवा वीजमापक (Meter) क्रमांक नोंदवावा. वितळतार नियंत्रण कक्षाचे (फ्युज कंट्रोल) दूरध्वनी क्रमांक विजदेयकावर छापलेले आहेत. वीजग्राहक क्रमांक (उदाहणार्थ १००-०२६-०८९.० असा) विद्युत देयकाच्या अगदी वरील बाजूस उजव्या कोप-यात छापलेला आहे. तसेच वीजमापक (Meter) क्रमांक हा विद्युत देयकाच्या मागील बाजूस, मध्यभागी असलेल्या टेबलच्या पहिल्या रकाण्यात दर्शविण्यात येतो या दोन पैकी एक क्रमांक तक्रार नोंदविताना आपल्या जवळ असणे अपेक्षित आहे, जेणेकरुन तक्रारीचे निवारण जलद गतीने करता येईल. वीज ग्राहक त्यांच्या वीज पुरवठाबाबतच्या तक्रारी ‘MiBest’ या ॲपवर नोंदवू शकतात. सदरचे ॲप वीज ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी (मोबाईल ) क्रमांकावर गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर वरुन डाऊनलोड करु शकतात.

वीजग्राहक त्यांच्या सदनिकांच्या खंडीत विद्युत पुरवठा विषयीच्या तसेच विजेच्या ठिणग्या उडणे, शॉक लागणे, आग लागणे इ. तक्रारी वितळतार नियंत्रण कक्षात नोंदवू शकतात. विभागनिहाय वितळतार नियंत्रण कक्षाचे (फ्युज कंट्रोल) दूरध्वनी क्रमांक खालील कोष्टकात नमूद करण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

चित्रपटगृहाने मराठी चित्रपट दाखवले नाही तर,राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

धक्कादायक!, महामार्गावर ट्रॅक्टर – बोलेरोचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

उद्धव ठाकरे हिंसाचाराच्या घटना घडवत आहेत, आमदार संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss