मुंबईकरांना आता लोकल प्रवासाचा चांगला आणि सुखद अनुभव मिळणार आहे. घामाघूम होणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता गारगार होणार आहे; कारण पश्चिम रेल्वेने ६ नोव्हेंबरपासून आणखी १७ एसी लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वातानुकूलित रेल्वेतून मुंबईकरांचा प्रवास गारगार होणार आहे. पश्चिम रेल्वे ६ नोव्हेंबरपासून आणखी १७ एसी ट्रेन चालू करणार असल्यामुळे एकूण ट्रेनची संख्या ९६ वर जाणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या मार्गावर आणखी १० वातानुकूलित लोकल ट्रेन सुरु होणार असून, या लोकल ट्रेन सीएसटीएम(CSMT) ते कल्याण, टिटवाळा, बदलापूर या मार्गांवर धावणार आहेत. पश्चिम रेल्वे या मार्गावर धावणाऱ्या नवीन एसी ट्रेन चर्चगेट ते विरार या मार्गावर धावणार आहे.
या वेळेत धावणार एसी ट्रेन
पश्चिम रेल्वे सोमवार ६ नोव्हेंबरपासून आणखी १७ एसी वातानुकूलित ट्रेन सेवा सुरू करणार आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये एकूण ३१ एसी लोकल धावत होत्या. आता ही संख्या वाढून ९६ वर जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. या नवीन वातानुकूलित एसी रेल्वेमुळे प्रवाशांचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यामुळे आरामदायक प्रवासाचा अनुभव मुंबईकरांना आता मिळणार आहे.
१७ एसी लोकल सेवांपैकी बोरिवली ते चर्चगेट दरम्यान सकाळी ७:४७, सकाळी ९:३५ आणि ११:२३ वाजता यादरम्यान जलद ट्रेन धावतील.
चर्चगेट येथून संध्याकाळी ३:०७ वाजता (विरार जलद), संध्याकाळी ६:२२ वाजता (विरार जलद) आणि रात्री ९:२३ वाजता (भाईंदर धीमी) या एसी लोकल सुरु होणार आहे.
या ट्रेन सेवा सोमवार ते शुक्रवार एसी सेवा म्हणून चालतील आणि शनिवार आणि रविवारी साधारण नॉन-एसी सेवा म्हणून चालतील. पश्चिम रेल्वे नवीन एसी लोकल सुरु करत असले तरी लोकल फेऱ्या यामुळे वाढणार नाहीत. लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणेच १३९४ इतक्या असणार आहेत.
डहाणू-अंधेरी सकाळी (६:०५) सेवांची एक जोडी चर्चगेटपर्यंत वाढवण्याचा निर्णयही पश्चिम रेल्वेने घेतला आहे. चर्चगेट येथून ही लोकल ट्रेन सकाळी ७:१७ वाजता डहाणूसाठी सुटेल. त्यामुळे काही उपनगरीय लोकल रेल्वे सेवांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने देखील ६ नोव्हेंबरपासून आपल्या मुख्य लाईनवरील एसी सेवांची संख्या एकूण ६६पर्यंत वाढवली आहे. याआधी पश्चिम रेल्वेत एकूण ५६ एसी लोकल धावत होत्या.
हे ही वाचा :
सणासुदीच्या काळात सुंदर दिसायचे आहे का? फॉलो करा ‘या’ टिप्स
‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिअॅलिटी शो मधून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला