spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

मोठी बातमी : विनोद तावडेंकडे सापडले ५ कोटी, क्षितिज ठाकूर ने केला आरोप….

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास बाकी असून आचार साहित्य लागू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलं आहे.

 

भाजप नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विरार पूर्वेला असणाऱ्या मानवेलपाडा येथील विवांत हॉटेलमद्ये विनोद तावडे आले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्या बैठक सुरु होती. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. आणि याठिकाणी पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप बहुजन विकासघडीचे कार्यकर्त्यांनी केला.

याच वेळी विवांत हॉटेलमध्ये विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्तिथ होते. यावेळी विनोद तायवाडे आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. विनोद तायवाडे हे हॉटेल मध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. त्यांच्यासोबत डायऱ्या देखील होत्या. त्या डायऱ्यामध्ये पैसे ज्यांना द्यायचे आहे त्यांचे नावे होती आणि त्या नावान पुढे त्यांना पैसे किती पैसे द्यायचे हे सुद्धा लिहून होते. त्या डायरी मध्ये १५ कोटींची नोंद असल्याचा आरोप क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. हा सगळा प्रकार घडल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्त्याने आक्रमक केला. आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाले.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपचा खेळ खल्लास…जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो, अशी टीका संजय राऊत यांनी ही घटना घडल्यानंतर केली.

निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी तपासली
विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी तपासली. ठाकूरांचे कार्यकर्ते गाडी तपासण्यासाठी मागत आहेत. मात्र आयोगाच्या टीमने गाडी तपासल्यानंतर कार्यकर्त्यांनीच काही गैरप्रकार केला तर काय, असं विनोद तावडेंच्या टीमचं म्हणणं आहे.

सदर घटनेवर हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?
5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

विनोद तायवाडे यांच्यावर गुन्हा दाखल
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही तास बाकी आहे. आणि आचार संहिता लागू झाल्या आहे. भाजपचे विनोद तायवाडे यांनी आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल निवडणूक आयोगाने केला आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss