मुंबई पोलिसांना महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक गँगस्टर डीके राव याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, डीके रावसह 6 आरोपींना खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
गुंड डीके रावसह आणखी 6 जणांनी त्याचे हॉटेल ताब्यात घेण्याचा कट रचला असल्याची तक्रार अँटी एक्स्टॉर्शन सेल, गुन्हे शाखा, मुंबई यांना हॉटेल व्यावसायिकाकडून मिळाली होती. याशिवाय अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. त्यामुळे डीके राव आणि त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू झाला. आता मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून सातही आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई केलीय. डी के राव आणि सहा जणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. डी के रावला 2017 सालच्या खंडणीच्या गुन्ह्यात 2022 साली हायकोर्टाकडून जामीन मिळाला होता. डी के राव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. डी के राव पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
डी के राव हा मुंबईतील कुख्यात गँगस्टर आहे. त्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. खंडणी, दरोडा आणि अन्य गुन्हेगारी कारवायांमध्ये याआधी सुद्धा त्याला अटक झाली आहे. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात छोटा राजनचा खास हस्तक अशी डी के रावची ओळख आहे. मुंबईतील बिझनेसमन, बिल्डर्सना खंडणीसाठी धमकावल्याचे आरोप त्याच्यावर झाले आहेत. विविध गुन्ह्यांखाली त्याला अनेकदा अटक झाली आहे.
हे ही वाचा :