Thursday, April 25, 2024

Latest Posts

मोठी बातमी! मी मुंबईत बॉम्बस्फोट…, ट्विटरवरून दिली धमकी

सध्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना धमक्यांचे कॉल हे येत आहेत तसेच आता महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचे मॅसेजचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

सध्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना धमक्यांचे कॉल हे येत आहेत तसेच आता महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचे मॅसेजचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रात सातत्याने बॉम्बस्फोटाच्या धमकीची प्रकरणे समोर येत आहेत. अश्यात मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकी आली आहे. परंतु या वेळेस ही धमकी फोन किंवा ईमेलवरुन (E-Mail) नाहीतर थेट ट्विटरवरुन (Twitter) धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत हि धमकीची पोस्ट टाकण्यात आली आहे.

आताच्या घडीची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राला उडवण्यासंदर्भात एक पोस्ट ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत हि धमकीची पोस्ट टाकण्यात आली आहे. या पोस्टमध्ये आरोपीने लिहिले की, “मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे”( “I M Gonna Blast The Mumbai Very Soon.”). सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही पोस्ट काल दिनांक २२ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

तसेच ही पोस्ट ट्विटर वर करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियाने ज्या क्षणी ही पोस्ट पहिली त्याच क्षणी संबंधित पोलिस ठाण्याला याबाबत कळवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या ट्विटर हँडलवरून हे पोस्ट करण्यात आले आहे त्याचीही चौकशी करण्यात येत आहे

हे ही वाचा:

अभिनेते Ray Stevenson यांनी वयाच्या ५८ वर्षी घेतला अखेरचा श्वास

IPL2023, आज खेळणार चेन्नई आणि गुजरात क्वालिफायर १

राज्यात २ भीषण अपघातांची नोंद, लग्नावरुन परतताना Amravati जवळ अपघात, ५ जणांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss