Saturday, April 20, 2024

Latest Posts

बिहारचे मुख्यमंत्री Nitish Kumar उद्या मुंबई दौऱ्यावर

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे उद्या दिनांक ११ रोजी (गुरुवारी) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण हे आले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे उद्या दिनांक ११ रोजी (गुरुवारी) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण हे आले आहे. या दौऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत अशी माहिती जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार कपिल पाटील यांनी दिली आहे.

उद्या नितीश कुमार हे मुंबई वर दौऱ्यावर असणार आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, देवेशचंद्र ठाकूर, सभापती विधान परिषद, संजय कुमार झा, मंत्री देखील असतील. कर्नाटक निवडणुकीनंतर नितीश दोन्ही नेत्यांना पाटण्याला निमंत्रित करण्याची शक्यता आहे जिथे ते विरोधकांची भव्य सभा घेणार आहेत. २०२४ च्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी तयार करण्यासाठी नितीश देशभरातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या विरोधी नेत्यांची भेट घेत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राबाहेरील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते ज्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पवारांना फोन करून तो मागे घेण्याची विनंती केली होती.

आतापर्यंत नितीश यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे.

दौरा कसा असेल?

  • दुपारी साडे बारा वाजता मुंबई विमानतळावर आगमन
  • दुपारी १ पर्यंत मातोश्री निवास्थानी आगमन
  • सव्वा दोन वाजता माध्यमांसमोर येण्याची शक्यता
  • अडीच वाजता सिल्व्हर ओकचा दिशेने रवाना
  • ३ वाजता शरद पवार यांच्यासोबत भेट
  • साडे तीन वाजता माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss