spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

“भाजपला मुंबई बड्या बिल्डर्सच्या घशात घालायची आहे”, Sanjay Raut यांचा विरोधकांवर टीकास्त्र

ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण झाली, भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला. असा थेट आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर अमराठी लोकांनी निर्घृण हल्ला केला, त्याचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटत आहे. त्याचा पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आरोप केला आहे. ते म्हणाले, ” कल्याणमध्ये अमराठी माणसावर परप्रांतीयांनी काल १९ डिसेंबर ला हल्ले केले. कल्याणमध्येच नाही तर मुंबईतही अशा घटना घडल्या आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही. मुंबईतही मराठी बोलायचं नाही, मराठी माणसाला जागा नाकारण्यात येतात. ही हिंमत? ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण झाली, भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला. असा थेट आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

पुढे ते म्हणाले, ” स्वतःला जे शिवसेना समजतात, मोदी शहांनी ज्यांच्या हातात शिवसेना आणि चिन्ह दिले, ते नामर्द लोक सरकारमध्ये बसले आहेत, त्यांना कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते का? असा थेट प्रश्न विचारात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार, हद्दपार करायचं हे फार मोठं कारस्थान आहे. काल कल्याणमध्ये मराठी माणसावर जो हल्ला झाला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

हे ही वाचा:

आश्वासने पूर्ण होणार; योजना बंद होणार नाहीत …महाराष्ट्र आता थांबणार नाही – CM Devendra Fadnavis

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss