एकीकडे विधिमंडळाचं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात नक्षलवाद, ईव्हीएमसारख्या अनेक मुद्द्यांवरून विरोधकांवर आरोप प्रत्यारोप झाले. तर दुसरीकडे मुंबईत आज मोठा हंगामा बघायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात शिरून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी छुप्या पद्धतीने आंदोलन केले, असा आरोप केला जातोय. तर काँग्रेसकडून ही आंदोलकांवर टीका केली जात आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला आहे.
भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. अंतर कार्यालयातील खुर्च्या तसेच इतर गोष्टींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलकांजवळ असलेल्या फलकावर काँग्रेस संविधानाचा अपमान करत असल्याचे म्हणण्यात आले होते. यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी कार्यालयाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, यावेळी खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न झाला. या सर्व परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
मुंबईत हा भाजप आणि काँग्रेस वादावरून मोठा हंगामा झाला आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात शिरून तोडफोड करण्याच्या प्रयत्नातून घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप लगावला.
हे ही वाचा:
एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही- Eknath Shinde
तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची ग्वाही