spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

BMC चा पेपर फुटला? पेपरफुटी घोटाळा Raj Thackeray यांच्या कोर्टात जाणार

मुंबई महापालिकेच्या गट अ च्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा करण्यात येतोय. या परीक्षेचा मोठा घोटाळा झाल्याची शक्यता आहे. महापालिकेच्या गट अ च्या ज्यापरीक्षा होत्या त्यात साधारणपणे १२०० लोक बसले होते. जो पेपर २५ तारखेला होणार होता, तो पेपर आधीच १९ तारखेला फुटला.

“मुंबई महापालिकेच्या गट अ च्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा करण्यात येतोय. या परीक्षेचा मोठा घोटाळा झाल्याची शक्यता आहे. महापालिकेच्या गट अ च्या ज्यापरीक्षा होत्या त्यात साधारणपणे १२०० लोक बसले होते. जो पेपर २५ तारखेला होणार होता, तो पेपर आधीच १९ तारखेला फुटला. आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक-एक प्रश्न दहा लाखालाविकला गेला. शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झाला. घोटाळेबाज असे इंजिनिअर तुम्ही पालिकेला देणार आहेत का?” असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

पुढे ते म्हणाले, “एकदा हे पैसे देऊन इंजिनिअर झाले की, नंतर पैसे खाण्याचेच काम करतील. यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले. लवकरात लवकर राज ठाकरे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या विषयावरती बोलणार आहेत”, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

माणसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, “माझ्याकडे हे प्रकरण आलं तेव्हा तक्रार केली. त्या दिवशी एक मोठा गट आम्हाला येऊन भेटला आणि त्यांची अपेक्षा होती की हा विषय राज ठाकरे यांच्याकडे पोहचावा. हा विषय त्यांच्याकडे गेला तर त्यांना न्याय मिळेल. काही लोकांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून राज ठाकरे यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. संदीप देशपांडे आणि मी साहेबांकडे आमचं मत मांडले. ते सीएम साहेबांशी बोलणार आहेत”, असं मनीष धुरी म्हणाले.

हे ही वाचा:

लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार?

Dhananjay Munde: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा अजित पवारांकडे राजीनामा ; करूणा मुंडेंचा मोठा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss