उच्च न्यायालयाने (HIGH COURT) हवेच्या प्रदूषणावरून (AIR POLLUTION) बोलल्यानंतर मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासन सतर्क झाले आहे. यानंतर मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते, पाण्याने धुण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. धूळ नियंत्रणासाठी १२१ टँकरसह इतर संयंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, गर्दी असलेले फुटपाथ स्वच्छ करून ते पाण्याने धुण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्त्रोतांमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केला जाणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी सुद्धा होणार नाही. तसेच, वारंवार होणारे हवेचे प्रदूषण आणि धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हवेतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आखल्या आहेत. या अंतर्गत सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते व जवळचे फुटपाथ स्वच्छ करण्यात येणार आहेत. संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ५५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करून धुवून काढण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर आणि इतर संयंत्रे मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पुनप्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्त्रोत मधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केला जाणार नाही, त्यामुळे पाण्याची नासाडी टाळण्यात येणार आहे.
वायु प्रदूषणाचा (AIR POLLUTION) निरनिराळ्या उपाय योजनांची प्रगती जाणून घेण्यासाठी ३ नोव्हेंबरला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये वायु प्रदूषण रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांबद्दल चर्चा करण्यात आली. मुंबई महानगरातील वायु प्रदूषणाने धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर ही कामे सुरू करण्यात आली आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार रस्ते आणि फुटपाथवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने धूळ प्रतिबंधक यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यासोबतच सर्व प्रशासकीय विभागांमध्ये प्रामुख्याने जिथे जास्त गर्दी असणार आहे, अशा परिसरांमध्ये रस्त्यांची विशेष स्वच्छता पाण्याने करण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
World Cup मधून बाहेर पडल्यावर Hardik Pandya ने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
INCOME TAX: कॅलेंडरमधून जाणून घ्या अंतिम तारखा