spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

मतमोजणी केंद्रात Mobile आणण्यास सक्त मनाई, मतमोजणीसाठी Mumbai शहर जिल्हा प्रशासन सज्ज

मुंबई शहर  (Mumbai City) जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दहा वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. मतदान केंद्रांवरील आवश्यक त्या सोयीसुविधा व उपाययोजनांबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहणी करुन सातत्याने आढावा घेत आहेत.

मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून धारावी विधानसभा मतदारसंघासाठी सत्यप्रकाश टी.एल. (भा.प्र.से.), सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी केदार नाईक, वडाळा विधानसभा मतदारसंघासाठी विक्रम सिंह मलिक, माहिम विधानसभा मतदारसंघासाठी हिमांशु गुप्ता, वरळी विधानसभा मतदारसंघासाठी समीर वर्मा, शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी के. सी. सुरेंदर, भायखळा विधानसभा मतदारसंघासाठी अंजना एम., मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी रवींद्र नाथ गुप्ता, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघासाठी शिल्पा शिंदे,  कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी मोहम्मद रेहान रझा ‌यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर  स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक  सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी वडाळा, माहिम आणि वरळी विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०५ टेबल, भायखळा आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०४, धारावी, शिवडी आणि मलबार हिल  विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०३ टेबल तर सायन कोळीवाडा आणि मुंबादेवी मतदारसंघासाठी प्रत्येकी ०२ असे एकूण ३६ टेबल असतील. सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी जिल्ह्यातील १०  विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक असे एकूण १० टेबल असतील. सकाळी ०८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.

हे ही वाचा:

Vidhansabha Election साठी मतदान प्रक्रियेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Worli तील तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? Milind Deora – Aaditya Thackeray – Sandip Deshpande

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss