Saturday, December 2, 2023

Latest Posts

CENTRAL RAILWAY: रेल्वे रूळ ओलांडाल तर काळे व्हाल

स्थानकावर किंवा स्थानकाच्या बाहेर पोहचण्यासाठी प्रवाशांकडून अनेकदा पुलाचा वापर करण्याऐवजी रेल्वेचे रूळ ओलांडण्याचा निर्णय घेतला जातो. रुळ ओलांडून अपघात होण्याच्या अनेक घटना घडलेल्या असूनही रूळ ओलांडण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. यावर तोडगा म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने एक प्रयोग करण्याचे ठरवले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने फलाटांजवळ असलेल्या काही जागा काळ्या रंगाच्या ग्रीसने रंगवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी त्या ठिकाणावरून प्रवासी रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतील त्यावेळी त्यांच्या हाताला आणि पायाला ग्रीस लागेल. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल, अशी आयडिया मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.

कोणीही रेल्वे लाईन ओलांडू नका, अशी सूचना नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून केली जाते. गर्दीच्या स्थानकांत काही सोयी-सुविधासुद्धा रेल्वेकडून करण्यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रेल्वे रूळ क्रॉस केल्यामुळे अनेकांचा अपघात झाला आहे. काहींचा यात मृत्यू होतो तर काही जण जखमी होतात. असा घटनांमुळे रेल्वे सेवेचा खोळंबा होऊन लाखो प्रवाशांना फटका बसतो. काळ्या रंगाचे ग्रीस प्रवाशांच्या कपड्यांना तसेच हातापायांना लागले तर अशा घटना कमी होतील, असा मानस मध्य रेल्वे प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. सरकते जिने, पादचारी पूल, लिफ्ट या गोष्टींची उभारणी करून प्रवाशांमध्ये रेल्वे रूळ ओलांडणे धोकादायक असल्याची माहिती दिली जाते. प्रवाशांमध्ये जनजागृती केली जाते. तरी काही नागरिक वेळ वाचवण्याच्या दृष्टीने रूळ ओलांडतात आणि हीच गोष्ट रेल्वे प्रशासनासाठी अडचणीची ठरत आहे.

रेल्वे रूळ ओलांडून अनेक प्रवासी आपला जीव गमावतात. ग्रीसमुळे प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच येत्या काही दिवसात मध्ये रेल्वेवरील सर्व स्थानकांत हा उपक्रम राबविण्यात येईल, अशी माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिली.

हे ही वाचा : 

Goa International Film Festival: मराठी चित्रपटांची निवड, सुधीर मुनगंटीवारांनी दिली माहिती

MARATHA RESERVATION : आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल, शांततेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss